Pimpri : पंपिंग स्टेशनमधील वीजपुरवठा अखंडीत राहणार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मैलाशुद्धीकरण केंद आणि पंपिंग स्टेशनसाठी अखंडीत वीजपुरवठ्याकरिता एक्सप्रेस फिडरची आवश्यक कामे करण्यात येणार आहेत. त्यासाठी तब्बल पावणेआठ कोटी रूपये खर्च होणार आहेत.

महापालिकेच्या पर्यावरण अभियांत्रिकी विभागामार्फत मैलाशुद्धीकरण केंद्र आणि पंपिंग स्टेशनसाठी अखंडीत वीजपुरवठा करण्यासाठी एक्सप्रेस फिडरची आवश्यक कामे करण्यात येणार आहेत. टप्पा दोन मधील या कामासाठी इच्छूक ठेकेदारांकडून निविदा मागविण्यात आल्या होत्या. निविदा खर्च 8 कोटी 90 लाख रूपये अपेक्षित धरण्यात आला.

त्यानुसार, चार ठेकेदारांनी दरपत्रक सादर केले. त्यापैकी एस. टी. इलेक्ट्रीकल्स यांनी निविदा दरापेक्षा 16.47 टक्के कमी म्हणजेच 7 कोटी 43 लाख रूपये दर सादर केला. निविदेतील अटीनुसार त्यावरील वस्तु व सेवा कर वेगळा देण्यात येणार आहे. त्यानुसार, एस. टी. इलेक्ट्रीकल्स यांच्यासमवेत करारनामा करण्यास स्थायी समितीने मान्यता दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.