Pimpri : शहराला मंत्रीपदाची पुन्हा हुलकावणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराला मंत्रीपदाने पुन्हा एकदा हुलकावणी दिली आहे. महाविकासआघाडीच्या सरकारमध्ये पिंपरीचे राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांना मंत्रीपदाची संधी मिळेल अशी अपेक्षा होता. परंतु, मंत्रीमंडळ विस्तारात बनसोडे यांनी संधी मिळाली नाही.

पिंपरी-चिंचवड शहराला आजपर्यंत एकदाही मंत्रीपद मिळाले नाही. देहूगावचे दिवंगत नेते प्रा. रामकृष्ण मोरे यांनी राज्यमंत्रीमंडळात शिक्षणमंत्री म्हणून कामकाज केले. त्यांनी शहराचे नेतृत्व केले होते. त्यानंतर अजित पवार यांनी देखील शहराचे नेतृत्व केले. परंतु, पिंपरी-चिंचवड शहरातून कोणीही राज्य मंत्रीमंडळात मंत्री झाले नाही.

_MPC_DIR_MPU_II

मागील भाजप सरकारच्या काळात आमदार लक्ष्मण जगताप आणि आमदार महेश लांडगे यांना मंत्रीपद मिळण्याची सातत्याने चर्चा झाली. पिंपरी महापालिकेत भाजपची सत्ता आल्यास शहराला लाल दिवा देण्याचे आश्वासन तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता देखील आली. पण, मंत्रीपद काही मिळाले नाही. केवळ चर्चाच झाली. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपची सत्ता जाऊन शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस महाविकास आघाडीची सत्ता आली.

महाविकास आघाडीच्या सरकारचा आज मंत्रीमंडळ विस्तार झाला आहे. या विस्तारात तीनही पक्षांच्या 36 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. मंत्रीमंडळ विस्तारात पुण्यातून राष्ट्रवादीच्या तिघाजणांना संधी देण्यात येणार असल्याचे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सांगितले होते. त्यामुळे पिंपरीचे राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांना संधी मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु, ती फोल ठरली आहे.

पुणे जिल्ह्यातून राष्ट्रवादीकडून अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तर, आंबेगावचे दिलीप वळसे पाटील यांनी कॅबिनेट तर इंदापूरचे दत्तात्रय भरणे यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.