Pimpri : आता रेल्वेप्रवासात आधारकार्ड बाळगू नका; ओळखपत्र म्हणून ‘एम आधार’ला मान्यता

एमपीसी न्यूज- रेल्वे प्रवास करताना ओळखपत्र म्हणून प्रवाशांना आधारकार्ड बाळगावे लागते. प्रवासाच्या घाईगडबडीत ते व्यवस्थित सांभाळून ठेवणे हे त्रासदायक ठरत असते. मात्र आता या त्रासातून रेल्वेप्रवाशांची सुटका झाली आहे. आता आधारकार्डाची मूळ प्रत जवळ ठेवण्याऐवजी आपल्या मोबाइलवर असलेले एम-आधार ऍप त्यासाठी पुरेसे असणार आहे. आयआरसीटीसी ने केलेल्या ट्वीटनुसार रेल्वेने एम-आधारला ओळखपत्र म्हणून मान्यता दिली आहे.

त्यासाठी प्रवाशाला आपल्या मोबाइलवर एम-आधार ऍप डाउनलोड करावे लागेल. यामध्ये संबंधित प्रवाशाला आपल्या आधारकार्डचा तपशील नोंद करावा लागेल. प्रवास करताना या ऍपचा पासवर्ड टाकल्यानंतर दाखवण्यात येणारे आधारकार्ड ओळखपत्राचा पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे.
एम-आधार ऍप हे भारतीय विशिष्ट पहचान प्राधिकरणाच्या वतीने सुरु करण्यात आले आहे.

नव्या सुविधेमुळे आधार कार्ड जवळ बाळगण्याची गरज नाही आणि ते हरवेल म्हणून चिंता करण्याची आवश्यकता नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.