Pimpri: पाण्यामुळे उलट्या, जुलाब व पोटदुखीच्या रुग्णांमध्ये वाढ नाही; ‘ही’ काळजी घेण्याचे पालिकेचे आवाहन

Pimpri: No patient increase in vomiting, diarrhea and abdominal pain due to water; pcmc appeals to take care of this ज्या ठिकाणांहून तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्या भागातील वितरण व्यवस्थेतील पाण्याची तपासणी केली असता त्यात सर्व ठिकाणी क्लोरिन आढळून आले आहे.

एमपीसी न्यूज- पिंपरी-चिंचवड शहरात उलट्या, जुलाब व पोटदुखीच्या रुग्णांमध्ये पाण्यामुळे वाढ झालेली नाही. शहराच्या बहुतेक भागांमधून, उलट्या, जुलाब व पोटदुखीचे पेशंट वाढत असल्याच्या तक्रारी पाणीपुरवठा विभागाकडे प्राप्त झाल्या होत्या. वितरण व्यवस्थेतील पाण्याची तपासणी केली असता त्यात सर्व ठिकाणी क्लोरिन आढळून आले आहे. पाण्यात सुरक्षित प्रमाणात क्लोरिन असणे, ही पाणी सुरक्षित व पिण्यायोग्य असल्याची खूण आहे, असे पाणीपुरवठा विभागाचे सह शहर अभियंता रामदास तांबे यांनी सांगितले.

शहराच्या विविध भागांतील नागरिक मागील चार दिवसांपासून अतिसार आणि पोटदुखीच्या आजाराने त्रस्त आहेत. अशुद्ध पाणी पुरवठ्यामुळे हा त्रास होत असावा, या शक्यतेने शहरातील नागरिकांकडून महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडे तक्रारी केल्या जात आहेत.

त्यावर पाणी पुरवठा विभागाने सांगितले की, शहराच्या बहुतेक भागांमधून, उलट्या, जुलाब व पोटदुखीचे पेशंट वाढत असल्याच्या तक्रारी महानगरपालिकेस प्राप्त होत आहेत.

प्राप्त झालेल्या तक्रारींच्या अनुषंगाने ज्या ठिकाणांहून तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्या भागातील वितरण व्यवस्थेतील पाण्याची तपासणी केली असता त्यात सर्व ठिकाणी क्लोरिन आढळून आले आहे.

पाण्यात सुरक्षित प्रमाणात क्लोरिन असणे, ही पाणी सुरक्षित व पिण्यायोग्य असल्याची खूण आहे. पाण्यात कोणतेही अपायकारक जिवाणू, विषाणू नाहीत, याची खातरजमा करण्यासाठी पाण्याचे नमुने घेऊन अणू जीव चाचण्याही घेण्यात आल्या आहेत. त्यातही, वितरण व्यवस्थेतील पाणी सुरक्षित व पिण्यायोग्य असल्याचे निष्पन्न झाले आहे.

तसेच, महानगरपालिकेतर्फे पुरविले जाणारे पाणी, सुरक्षित व पिण्यायोग्य असल्याबाबत बाहेरील प्रयोगशाळेतूनही खातरजमा करण्यात आली आहे. पालिका वितरित करीत असलेले पाणी सुरक्षित व पिण्यायोग्य असल्याने नागरिकांनी घाबरून जाऊ नये.

_MPC_DIR_MPU_II

उलट्या,जुलाब व पोटदुखीचे कारण विषाणूजन्य (Viral) अथवा अन्य कारणेही असू शकतात. त्या दृष्टीकोनातून, प्रत्यक्ष कारण शोधण्यासाठी उलट्या, जुलाब, पोटदुखी असणाऱ्या आजारी व्यक्तींच्या आवश्यक त्या चाचण्या करण्यात येतील.

पिंपरी-चिंचवडवासियांना पालिकेचे आवाहन

पिण्याचे पाणी उकळून थंड करून प्यावे. पाणी व्यवस्थित झाकून ठेवावे. ताजे अन्न पदार्थ खावेत. शिळे अन्न खाऊ नये. अन्न पदार्थ झाकून ठेवावेत. उघड्यावरील तसेच बाहेरील अन्न पदार्थ खाऊ नयेत. फळभाज्या, पालेभाज्या व्यवस्थित स्वच्छ धुवून, व्यवस्थित शिजवून खाव्यात.

जेवणापूर्वी तसेच शौचाहून आल्यानंतर हात साबणाने स्वच्छ धुवावेत. घर व परिसर स्वच्छ ठेवावे, जेणेकरून माशा होणार नाहीत. जमिनीवरील पाण्याची टाकी तसेच इमारतीवरील पाण्याची टाकी स्वच्छ असल्याबाबत खातरजमा करून त्यावर झाकण व्यवस्थित असल्याची खात्री करावी.

आपल्याला गढूळ पाणी येत असेल तसेच कोठेही पाण्याची गळती दृष्टिपथास आल्यास त्वरित सारथी हेल्पलाईन क्रमांक 8888006666 वर कळवावे.

कोरोना-कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर शासन तसेच महानगरपालिकेच्या निर्देशांचे पालन करावे. कोरोनाशी लढण्यासाठी तोंडाला व नाकाला मास्क लावण्यात सर्वांचेच हित आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

You might also like