_MPC_DIR_MPU_III

Pimpri : बीआरटी मार्गातून अन्य वाहनांसाठी प्रवेश बंद; पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे आदेश

आपत्काल समयी रुग्णवाहिका, अग्निशमन आणि पोलीस वाहनांना सूट

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड शहरात दापोडी ते निगडी या मार्गावर बीआरटी बस सेवा सुरू झाली आहे. सध्या बीआरटी मार्गातून अन्य वाहने धावत आहेत. त्यामुळे काही वेळेला बीआरटी सेवेसाठी अडथळा निर्माण होतो. त्यासाठी बीआरटी मार्गातून बस व्यतिरिक्त इतर वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. याबाबतचे आदेश पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे अपर पोलीस आयुक्त मकरंद रानडे यांनी दिले आहेत.

_MPC_DIR_MPU_IV

दापोडी ते निगडी या बीआरटी मार्गावर बीआरटी बस व्यतिरिक्त अत्यावश्यक सेवेतील रुग्णवाहिका, अग्निशमन आणि पोलीस वाहने यांना प्रवेश देण्यात आला आहे. अन्य वाहने बीआरटी मार्गातून धावताना आढळल्यास कायदेशीर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. तसेच बीआरटी मार्गात पार्किंग देखील करता येणार नाही. याबाबत यापूर्वी जर कोणते आदेश काढले असतील तर ते सर्व आदेश रद्द करण्यात येत असल्याचेही अपर पोलीस आयुक्तांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे.

_MPC_DIR_MPU_II

दापोडी ते निगडी या बीआरटी मार्गावर अन्य वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. याबाबत नागरिकांना काही हरकती अथवा सूचना असतील तर नागरिकांनी आपल्या हरकती अथवा सूचना लेखी स्वरूपात 12 सप्टेंबर 2018 पर्यंत पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यालयात पाठवाव्यात, असे आवाहन देखील नागरिकांना करण्यात आले आहे. नागरिकांच्या सूचना आणि हरकती यांचा विचार करून अंतिम आदेश काढण्यात येणार आहे.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.