Pimpri: एमआयडीसीचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद; ‘या’ भागातील पाणी राहणार बंद

एमपीसी न्यूज – देखभाल, दुरुस्तीच्या कामामुळे औद्योगिक विकास महामंडळाकडून (एमआयडीसी) पिंपरी-चिंचवड शहरात होणारा पाणीपुरवठा उद्या (गुरुवारी) बंद राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पिंपरी-चिंचवड शहराच्या काही भागात एमआयडीसीकडून पाणीपुरवठा केला जातो. देखभाल, दुरुस्तीच्या कामासाठी उद्या एमआयडीसीचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे पिंपरी, चिंचवड, भोसरी, देहूरोड, कासारवाडी, निगडी, सीएमई, दिघी, तळवडे, चाकण, कॅन्टोमेंट बोर्ड, ओएफडीआर आदी भागातील पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार आहे, असे एमआयडीसीच्या चिंचवड कार्यलयाचे स्थापत्या विभागाचे कार्यकारी अभियंता सु. श. मलाबादे यांनी कळविले आहे.

गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहिल्यामुळे शुक्रवारी पाणीपुरवठा कमी दाबाने होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.