Pimpri : नामस्मरणाला पर्याय नाही -हभप संदीप मांडके

एमपीसी न्यूज – काळाच्या तडाख्यात सापडायचे नसेल तर नामस्मरणाला पर्याय नाही, असे मत ह.भ.प. संदीप मांडके यांनी निगडी येथील नारदीय कीर्तन महोत्त्सवात मांडले. जगतगुरु तुकाराम महाराजांच्या अभंगावर निरूपण करत उपस्थित जनसमुदायचे त्यांनी प्रभोधन केले.

साक्षात भगवान पांडुरंगाचे रूप म्हणजे जगतगुरु तुकाराम महाराज होय. तुकाराम महाराज म्हणत भगवंताच्या नामामुळे मी काळाच्या हाती पडणार नाही. कर्म केले की फळ मिळते हा कर्माचा सिद्धांत आहे. ज्या कर्माचे फळ या जन्मात मिळत नाही किंवा जन्मांतराने मिळते त्याला संचित म्हंटले जाते आणि पूर्व संचितानुसासर वर्तमानात आपल्याला फळे मिळत असतात असे मत ह.भ.प. संदीप मांडके यांनी तुकाराम महाराजांच्या अभंगावर निरूपण करताना मांडले.

निगडी येथे सुरु झालेल्या तीन दिवसीय नारदीय कीर्तन महोत्त्सवात ह.भ.प. संदीप मांडके यांनी काल (दि . 8 ) रोजी दुसरे पुष्प गुंफले.महाराजांनी विविध दाखले देत व सुरेल गायन करत उपस्थितांचे प्रभोधन केले.

याप्रसंगी कार्यक्रमाच्या आयोजिका व महापालिका प्रभाग अ च्या अध्यक्षा शर्मिला बाबर उपस्थित होत्या तसेच सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र बाबर व ह.भ.प. दीपक रस्ते यांनी उपस्थिती दर्शवली होती.

                                  “ज्यांसी प्रपंचाचा बहू विस्तार
                                     त्यांस सभाग्य म्हणती थोर”
असे एकनाथ महाराज म्हणतात. या प्रपंचात तरुण जायचं असेल तर नाम हे साधन आहे आणि परमेश्वर हे साध्य आहे. भक्तीमय वातावरणात महाराजांनी लो्कांची मने जिंकली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.