Pimpri : पिंपरी-चिंचवड जैन महासंघाचे अहिंसा पुरस्कार जाहीर

भूषण तोष्णीवाल, मंदार देव, अशोक देशमाने यांची निवड

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड जैन महासंघाच्या वतीने देण्यात येणारा अहिंसा पुरस्कार यंदा सीए भूषण तोष्णीवाल, चिंचवड देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष मंदार देव महाराज आणि अशोक देशमाने यांना जाहीर झाले आहे. भगवान महावीर जयंतीचे औचित्य साधून उदया बुधवारी (दि.17) संध्याकाळी चिंचवडच्या प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. अशी माहिती महासंघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अशोक कुमार पगारिया यांनी दिली.

_MPC_DIR_MPU_II

जैन महासंघाच्यावतीने दि. 11 एप्रिलपासून अहिंसा सप्ताह सुरु झाला असून कासारवाडी येथील जैन स्थानकात पार्श्वनाथ युवक मंडळाच्या वतीने भक्तामर पठण करण्यात आले. दि. 12 एप्रिल रोजी उद्यमनगर येथील जैन मंदिरात प्रगती महिला सोशल ग्रुपच्यावतीने भजनसंध्या, तसेच दि. 13 एप्रिलला आनंद मंगल एज्युकेशन सोसायटीच्या सभागृहात वक्तृत्व स्पर्धा व निबंध स्पर्धा घेण्यात आली. दि. 14 एप्रिल रोजी केजुबाई बंधारा थेरगाव येथे रोटरी क्लब वाल्हेकरवाडी व पिंपरी-चिंचवड जैन महासंघ यांच्यावतीने जलपर्णीमुक्त पवनामाई अभियान राबविण्यात आले. तसेच पॅन हॉस्पिटल येथे जैन सोशल ग्रुपच्यावतीने आरोग्य चिकित्सा शिबिर तसेच पार्श्वपद्मावती महिला मंडळाच्यावतीने निगडी येथे पाककला स्पर्धा घेण्यात आली.

  • उद्या, बुधवारी (दि. 17) दुपारी सव्वातीन वाजता थेरगाव जैन स्थानकांतून अहिंसा रॅली निघणार असून प्रा. रामकृष्ण मोरे सभागृहात या रॅलीचा समारोप होणार आहे. त्यानंतर पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम होईल. तसेच मोहनकुमार भंडारी यांचा एक श्याम प्रभु के नाम हा भक्तीगीतांचा कार्यक्रम होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.