Pimpri: भाजपमध्ये नाराजीमा नाट्य सुरुच; आशा शेंडगे यांचा शहर सुधारणा समिती सदस्यत्वाचा राजीनामा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपमधील राजीनामा नाट्य काही केल्या संपेना. सत्तेला दोन वर्ष पूर्ण झाली तरी नगरसेवकांचे राजीनामा सत्र सुरुच आहे. कासारवाडीच्या भाजप नगरसेविका आशा शेंडगे यांनी शहर सुधारणा समिती सदस्यत्वाचा राजीनामा महापौर राहुल जाधव यांच्याकडे दिला आहे. सभापतीपद डावलल्याने त्यांनी राजीनामा दिल्याची चर्चा महापालिका वर्तुळात आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपमध्ये गेल्या दोन वर्षांपासून राजीनामा सत्र सुरुच आहे. सर्वप्रथम नगरसेवक शीतल शिंदे यांनी विधी समिती सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यानंतर स्थायी समिती अध्यक्षपद डावलल्याने विद्यमान महापौर राहुल जाधव, शीतल शिंदे यांनी स्थायी सदस्यत्वाचा राजीनामा दिला. विधी समिती मागितली असताना क्रीडा समिती दिल्याचा आरोप करत भाजप नगरसेविका अश्विनी बोबडे यांनी नियुक्तीनंतर पाचच मिनिटात क्रीडा समिती सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता.

  • जाधववाडीचे वसंत बोराटे यांनी विधी समिती सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. आता कासारवाडीच्या भाजप नगरसेविका आशा शेंडगे यांनी शहर सुधारणा समिती सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. महापौर राहुल जाधव यांच्याकडे त्यांनी राजीनामा दिला आहे. स्वखुशीने राजीनामा देत असून राजीनामा स्वीकारुन योग्य ते सहकार्य करण्याची विनंती त्यांनी महापौरांना केली आहे. दरम्यान, शहर सुधारणा समितीचे सभापतीपद डावलल्याने शेंडगे यांनी राजीनामा दिल्याचे बोलले जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.