Pimpri : महिलेशी मोबाईलवर अश्‍लिल संभाषण करणाऱ्यावर गुन्हा

एमपीसी न्यूज – मोबाइल फोनवरून महिलेली अश्‍लिल संभाषण करणाऱ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी (दि. 16) सायंकाळी पिंपरी येथे घडली.

या प्रकरणी पोलिसांनी 9606274647 या क्रमांकाच्या मोबाइल धारकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पीडित महिलेच्या पतीने मंगळवारी (दि. 17) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी पीडित महिला तिच्या घरी असताना आरोपीने त्यांच्या मोबाइलवर फोन केला. ‘रेश्‍माने मुझे आपका नंबर दिया है’, असे म्हणत त्याने पीडित महिलेशी अश्‍लिल बोलून तिचा विनयभंग केला. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.