Pimpri: ‘अधिकारी निर्ढावले; महासभा सुरू असताना कार्यालयात बसून; गैरहजर अधिकाऱ्यांना नोटीस द्या’

नोटीस देण्याची मागणी करताच अधिकारी धावत आले सभागृहात

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेची सर्वसाधारण सभा सुरू असतानाही निर्ढावलेले अधिकारी कार्यालयात बसतात. आयुक्तांचे प्रशासनावर नियंत्रण राहिले नाही. गैरहजर राहणाऱ्या अधिकाऱ्यांना नोटीस देण्याची मागणी भाजप नगरसेवक बाबू नायर यांनी केली. नोटीस देण्याची मागणी होताच कार्यालयात ठाण मांडून बसलेले अधिकारी धावत सभागृहात आले.

महापालिकेची जुलै आणि ऑगस्ट महिन्याची तहकूब सभा आज (बुधवारी) आयोजित केली आहे. महापौर राहुल जाधव सभेच्या अध्यक्षस्थानी आहेत.

महासभा सुरू असताना केवळ तीन अधिकारी सभागृहात उपस्थित होते. शहरातील विस्कळीत पाणीपुरवठ्यावर चर्चा सुरू झाली. तरी, देखील अधिकारी सभागृहात उपस्थित नव्हते. याला भाजप नगरसेवक बाबू नायर यांनी हरकत घेतली. महासभा सुरू असताना केवळ तीन अधिकारी सभागृहात उपस्थित आहेत. आयुक्तांचे अधिकाऱ्यांवर नियंत्रण आहे का? उर्वरित अधिकारी सभागृहात का उपस्थित नाहीत. त्याचा आयुक्तांनी खुलासा करावा. गैरहजर अधिकाऱ्यांना नोटीस देण्याची मागणी नायर यांनी केली.

महापौर राहुल जाधव यांनी अधिकाऱ्यांनी सभागृहात उपस्थित रहावे असा आदेश दिला. त्यांनतर दालनात बसलेले अनेक अधिकारी सभागृहात धावत आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.