Pimpri : शिवशाही व्यापारी संघाच्या प्रादेशिक निवड नियुक्त्या जाहीर

एमपीसी न्यूज – शिवशाही व्यापारी संघ सोल्हापुर जिल्हा अध्यक्षपदी जीवन बिभीषन राऊत यांची, उस्मानाबाद जिल्हा अध्यक्षपदी सुदर्शन कालिदास गोऱ्हे यांची तर शिवशाही महीला आघाडीच्या कार्याध्यक्षपदी सुनीता खंडाळकर यांची निवड करण्यात आली आहे.

तसेच शिवशाही व्यापारी संघ टेंभूर्णी शहर अध्यक्ष रवींद्र राऊत, पुणे शहर महिला उपाध्यक्षपदी महादेवी जवळकोटे, तसेच खडकवासला विधानसभा मतदासंघ महिला अघाडी अध्यक्षपदी संगीता नाईक यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे.

यावेळी शिवशाही व्यापारीसंघ प्रदेश अध्यक्ष युवराज दाखले, प्रदेश सचिव गणेश आहेर, बाळासाहेब गायकवाड, मारूती मस्के, गोरख पाटील, प्रवीण जगताप, शिवसेना टेम्भूर्णी शहरप्रमुख सुरेश लोंडे, उपशहरप्रमुख संतोष खैरमोडे, प्रशांत सोनवने, युवासेनेचे शहरप्रमुख कुलदीप पाटील आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.