BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : किरकोळ कारणावरून एकावर चॉपरने वार; आरोपी अटकेत

695
PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज – किरकोळ कारणावरून एकावर चॉपरने वार केले. ही घटना पिंपरी येथे रविवारी (दि. 10) दुपारी सव्वा बाराच्या सुमारास घडली. पिंपरी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

याप्रकरणी ज्वाला उर्फ उदय केदारसिंग गुरखा (वय 27, रा. खराळवाडी, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार दिपक विठ्ठल पवार (वय 33) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी उदय सामान आणण्यासाठी पिंपरी येथे गेले होते. त्यावेळी त्यांच्या ओळखीचा नागेश बाबुराव कांबळे तेथे भेटला. उदय नागेश यांना बोलत उभारले. आरोपी दीपक देखील नागेश यांच्या सोबत होता. यावेळी आरोपीला वाटले की उदय हे नागेशला शिवीगाळ करत आहेत.

याचा राग मनात येवून त्याने चॉपरने उदय यांच्या तोंडावर व नाकावर वार केले तसेच लाथा बुक्‍क्‍यांनी मारहाण केली. याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी आरोपीला अटक केले असून पोलीस तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1
.