Pimpri : भोसरीत रंगला वाद्यमहोत्सव, मावळातील ढोणू आई मित्र मंडळ आमदार चषकाचे मानकरी

एमपीसी न्यूज – भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त भोसरीत ढोल, लेझीम स्पर्धा घेण्यात आला. त्यामध्ये मावळातील ढोणू आई मित्र मंडळाने प्रथम क्रमांक पटकावित आमदार चषक मिळविला.

या स्पर्धेचे उद्घाटन वस्ताद किसन लांडगे यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार महेश लांडगे, दत्ता गव्हाणे, सागर हिंगणे, अशोक पठारे उपस्थित होते. स्पर्धेत 27 संघ सहभागी झाले होते.

मावळातील ढोणू आई मित्र मंडळाने आमदार चषक मिळविला. भैरवनाथ मित्र मंडळ पुसणे, ओम श्री भैरवनाथ तरुण मंडळ कालेमावळ, श्री हनुमान मित्र मंडळ बोर गावठाण, जय हनुमान मित्र मंडळ बोरजमावळ, भैरवनाथ तरुण मंडळ काळेमावळ, नवचैतन्य मित्र मंडळ दापोडी यांनी अनुक्रमे दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा आणि सातव्या क्रमांक मिळविला.

व्यक्तिगत पारितोषकामध्ये शिस्तबद्ध संघ म्हणून दापोडीतील नवचैतन्य मित्र मंडळाने पहिला क्रमांक पटकाविला. उत्कृष्ट ढोलवादक संतोष कडू, उत्कृष्ट ताशावादक ऋषिकेश साखरे, उत्कृष्ट घंटावादक सुरेश कालेकर, उत्कृष्ट झांजवादक निलेश विपुले यांचा गौरव करण्यात आला. पंच म्हणून पैलवान अक्षय लांडगे, निलेश माने, रोहिदास फुगे, संकेत अर्धांळकर यांनी कामकाज पाहिले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन शिंगोटे यांनी केले. स्पर्धेच्या आयोजनात बाळासाहेब पवळे, कालिदास लांडगे, संतोष लांडगे, अशोक शेंडगे यांनी पुढाकार घेतला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.