Pimpri : व्हॅलेंटाईन डे च्या पूर्वसंध्येला प्रेयसीच्या शोधात तरुणाई एकवटली

चिंचवड मध्ये देवदत्त कशाळीकर यांच्या छायाचित्र प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद

एमपीसी न्यूज-सुप्रसिद्ध छायाचित्रकार देवदत्त कशाळीकर यांनी सादर(Pimpri)केलेल्या “प्रेयसी” या छायाचित्र प्रदर्शनात मंगळवारी व्हॅलेंटाईन डे च्या पूर्वसंध्येला प्रेयसीच्या शोधात तरुणाईने गर्दी केली होती.

चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे कलादालनात हे प्रदर्शन बुधवारी (दि.१४) रात्री नऊ वाजेपर्यंत विनामूल्य असून कलारसिकांनी प्रदर्शन पाहून आपला अभिप्राय नोंदवावा असे आवाहन आयोजक देवदत्त आणि वर्षा कशाळीकर यांनी केले आहे.

सुप्रसिद्ध गीतकार, कवी गुरु ठाकूर यांच्या हस्ते आणि सुप्रसिद्ध(Pimpri)कला दिग्दर्शक महेश कुडाळकर यांच्या उपस्थितीत सोमवारी या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. यावेळी त्यांच्या हस्ते वर्षा कशाळीकर यांचा गौरव करण्यात आला. गुरू ठाकूर आणि वर्षा कशाळीकर यांनी या छायाचित्रांना साजेशा कविता करून बोलके केले आहे.

प्रेयसी आणि निसर्ग यांचं नातं कला रसिकांसमोर मांडले आहे. स्पेशल आरकईव्ह अशा कॅनव्हास वर सप्तरंगाची मुक्त उधळण करीत अतिशय सुंदर कलाविष्कार असणारी 60 पेक्षा जास्त छायाचित्र या प्रदर्शनात आहेत.

Pune: सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते मान्यवर लेखकांच्या पुस्तकांचे प्रकाशन

चेहऱ्याशिवाय देखील रंग, रेषा आणि नैसर्गिक प्रकाशाचा वापर करून उत्कृष्ट कलाकृती कशाळीकर यांनी सादर केली आहे. सर्वच वयोगटातील कलारासिकांना भावणारी ही छायाचित्रे महाराष्ट्र, लडाख, कर्नाटक, गोवा, गुजरात, उत्तर प्रदेशात जाऊन थंडी, ऊन, वारा, पाऊस अगांवर झेलत घेतली आहेत.

या प्रदर्शनास भेट देणाऱ्या कला रसिकांनी ड्रॉप बॉक्स मध्ये आपल्या आवडत्या फोटो फ्रेमचा क्रमांक द्यावा. ड्रॉप बॉक्स मधील एकूण तीन भाग्यवान कलारसिकांना या प्रदर्शनातील मूळ फ्रेम बुधवारी रात्री नऊ वाजता व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी प्रदर्शन स्थळी भेट देण्यात येणार आहे.

देवदत्त कशाळीकर यांच्या विषयी :- भारत सरकार चा युवक कल्याण मंत्रालयचा पुरस्कार आणि महाराष्ट्र शासनाचा प्रथम पुरस्कार प्राप्त पुणे जिल्ह्यातील फोटोग्राफर आहे. तसेच निकॉन पुरस्कार, कॅनन पुरस्कार, जगदीश खेबूडकर पुरस्कार, मोरया पुरस्कार, टाइम्स ऑफ इंडिया पुरस्कार, वसुंधरा फिल्म पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

मागील 28 पेक्षा जास्त वर्षे फोटोग्राफी क्षेत्रात कामकाज, पिंपरी चिंचवड महानगपालिका आस्थापनेवरील प्रसिद्धी विभागासाठी २० वर्षे काम केले आहे.आजवर महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेर अनेक विषयावर फोटोग्राफी प्रदर्शने आयोजित केली आहे.

सध्या डॉक्यूमेण्ट्री, फिल्म मेकिंग प्रकारात कार्यरत आहेत. अनेक नामवंत वृत्तसंस्था, नामांकित चॅनल साठी फोटो जर्नलिस्ट म्हणून काम करत आहेत. अतुल्य भारत या विषयावर पूर्ण भारताचे सांस्कृतिक चित्रीकरण करण्याचा त्यांचा प्रकल्प सुरू आहे.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.