Pimpri : महापरिनिर्वाण दिनानिमित्त भीम गीतातून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना

एमपीसी न्यूज- महापरिनिर्वाण दिनानिमित्त भीम गीतातून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देण्यात आली.

बोधिसत्व प्रतिष्ठान संचलित शरदनगर येथील राजर्षी शाहू महाराज विद्यालयात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने भीमगीताचे आयोजन केले होते. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरित्र गायनातून विद्यार्थ्यांसमोर गायन धम्म बांधव संघाचे अध्यक्ष अनंत पवार यांनी केले. हार्मोनियम वादन मुख्याध्यापक राजेंद्र कांबळे, तर ढोलकीची साथ जनार्दन हुसळे,तसेच विकास म्हस्के संतोष घरडे,सचिन कांबळे यांनी साथ दिली.

यावेळी” अरे सागरा भीम माझा इथे निजला शांत हो जरा “, चालवेना मार्ग आले फोड पाया”…, उमर मे बाली भोलीभाली शिल कि झोली हूँ… भीमराज कि बेटी मै तो जयभीमवाली हूँ.. अशी डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या आयुष्यावर गाणी सादर करून भिममय वातावरण निर्माण केले.

यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून डॉ. आंबेडकर यांचा जीवनपट उलगडला आहे .यावेळी बोधिसत्व प्रतिष्ठानचे अध्यक्ष गोकुळ गायकवाड,सचिव लहू कांबळे,मुख्याध्यापक बाबाजी शिंदे आदी शिक्षक उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रूपाली पवार यांनी तर आभार सुजाता जोगदंड यांनी मानले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.