BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : रमजाननिमित्त फळांना मागणी

0 92
PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज – मुस्लिम बांधवाचा पवित्र मानला जाणारा रमजान महिना सुुरु झाला आहे. या महिन्यात मुस्लिम बांधव उपवास करत असल्याने फळांची मागणी मोठ्या प्रमाणात करतात. त्यातुलनेत यंदाही वाढत्या मागणीमुळे फळांच्या किंमती वाढल्या आहेत.

यामध्ये खरबूज, टरबूज, चिकू, पपई, नारळ, अंगूर, आंबा आदी प्रकारची फळे विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात दाखल झाली आहेत. विशेष म्हणजे यंदा रमजान महिना उन्हाळ्यातच आला असल्याने तहानेने जीव व्याकूळ होऊ नये, म्हणून पहाटेच्या आहारात फळांचा सर्वाधिक वापर केला जातो.

  • या फळांमध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असल्याने उपवासाच्या काळात या रसदार फळांना मोठ्या प्रमाणात मागणी वाढते. विशेष म्हणजे, या काळात या रसदार फळांचा हंगाम सुरू होत असल्याने त्यांची आवकही मोठ्या प्रमाणात होत आहे. या काळात कलिंगड, खरबूज, अननस, पपई या फळांना अधिक मागणी असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
.

HB_POST_END_FTR-A1
HB_POST_END_FTR-A3