Pimpri: लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थांना फळे तर, भजनी मंडळाला टाळ-मृदंगाचे वाटप

मराठवाडा जनविकास संघ व जय भगवान महासंघ यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजन

एमपीसी न्यूज – पिंपळे गुरव येथील मराठवाडा जनविकास संघ व जय भगवान महासंघ यांच्या संयुक्त विद्यमानाने लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची जयंती मराठवाडा जनविकास संघाच्या प्रांगणात साजरी करण्यात आली.

गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त चिखली येथील विकास आश्रमातील विद्यार्थांना फळे व धान्य तसेच मौजे बिजनवाडी येथील भजनी मंडळाला 25 टाळ व मृदंगाचे वाटप करण्यात आले. गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.

यावेळी बोलताना ह.भ.प. तांदळे महाराज म्हणाले की, गोपीनाथ मुंडे हे जनसामान्यांचे नेते होते. त्यांचे कार्य प्रेरणादायी व बोधप्रद असेच होते. पिंपरी-चिंचवडनगरीमध्ये मराठवाड्यातील बांधवांसाठी मराठवाडा भवन व गोपीनाथ मुंडे यांचे स्मारक उभे करण्याचे मराठवाडा जनविकास संघाने ठरविले आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या पुढील जयंतीपर्यंत याचे भूमिपूजन होईल.

अरुण पवार म्हणाले की, गोपीनाथ मुंडे यांचे कार्य फार महान आहे. आपल्या मराठवाडा भागातील सुमारे चार लाख बांधव उदरनिर्वाहासाठी पिंपरी-चिंचवड शहरामध्ये आपली मातृभूमी सोडून स्थायिक झालेले आहेत. त्यांच्या मुला मुलींच्या शिक्षणाची गैरसोय होऊ नये, हे मराठवाडा भवनाचे उद्दिष्ट आहे. यासाठी मराठवाडा जनविकास संघाने जनगणना सुरु केली असून, त्या यामध्ये एक लाखाच्या पुढे नोंदणी पूर्ण झालेली आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. संपत गर्जे होते. यावेळी ह.भ.प. तांदळे महाराज, राजपूत महासंघाचे दिनेशसिंह राजपूत, जोशी, मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार, जय भगवान महासंघाचे हनुमंतराव घुगे, भैरवनाथ जेष्ठ नागरिक संघ सदस्य, भीष्माचार्य जेष्ठ नागरिक सदस्य, संत गाडगेबाबा जेष्ठ नागरिक सदस्य, श्रीकांत चौगुले, जय भगवान महासंघाचे पुणे जिल्हा अध्यक्ष गणेश ढाकणे, पिं. चिं. शहराध्यक्ष अमोल नागरगोजे, समाज प्रबोधनकार शारदा मुंडे, प्रकाश बंडेवार, कृष्णाजी खडसे आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मारुती बानेवार यांनी, तर मराठवाडा जनविकास संघाचे सहसचिव वामन भरगंडे यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.