Pimpri : चिमुकल्यांच्या किलबिलाटाने गजबजल्या शाळा

एमपीसी न्यूज – नवा गणवेश, नवी पुस्तके, बॅग अन् नवे सवंगडी सोबत घेऊन शाळेला ‘स्कूल चले हम’ असे म्हणत शिक्षणाच्या वाटेवरील चिमुकल्यांनी हसत-खेळत शाळेच्या पहिल्या दिवशी आज उपस्थिती लावली. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. चिमुकल्यांच्या उपस्थितीने पुन्हा शाळा गजबजल्या.

उन्हाळी सुट्यांचा आनंद घेतलेल्या विद्यार्थ्यांनी आज शाळेच्या प्रांगणात आपल्या सवंगड्याांची विचारपूस केली हसण्या, खेळण्यानी शाळेचा परिसर असा गजबजून जाऊन पुन्हा बच्चे कंपनीची किलबिलाट सुरु झाली.

  • जवळपास दोन महिन्याच्या प्रदीर्घ उन्हाळी सुटीनंतर शाळातील घंटा आज पुन्हा वाजली. नवीन ड्रेस, कंपास पेटी, वह्या, दप्तर आदी घेवून बच्चे कंपनी शाळेत पोहचली. तेव्हा पहिल्या दिवशीचा ठोका कानावर पडताच विद्यार्थी आनंदले, त्यांनी पहिल्या दिवशी धम्माल मस्ती केली.शाळेचा पहिला दिवस असल्याने मागील तीन-चार दिवसांपासून पालकमंडळी तयारी करीत होते.

सकाळी मुलांना शाळेत पाठविण्याची घाई-गडबड प्रत्येक घरोघरी सुरु होती. दोन महिन्याच्या सुटीनंतर बच्चे कंपनीतही उत्साह होता. शाळेत पाऊल टाकताच विद्यार्थी गप्पात रंगले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.