Pimpri : शहरातील शाळेत किलबिलाट झाला सुरु

गुलाबाचे फुल देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत; शाळा परिसरात पालकांची गर्दी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात देखील आजपासून शाळा सुरु झाल्या. शहरात पालिकेच्या आणि खासगी शाळेत मुलांचे गुलाबाचे फूल देऊन उन्हाळी सुट्टीनंतर आज सकाळी शाळेची पहिली घंटा झाली. गेल्या काही दिवसांपासून शांत असणाऱ्या शाळेच्या परिसरात विद्यार्थ्यांची किलबिल सुरू झाली.

शाळेचा पहिला दिवस असल्यामुळे पालकही आपल्या पाल्याला शाळेत सोडण्यासाठी आले होते. शाळेचा परिसर विद्यार्थ्यांसोबतच पालकांच्या गर्दीने फुलला होता. परिसर विद्यार्थ्यांसोबतच पालकांच्या गर्दीने फुलला होता. दरम्यान, अनेक शाळांमध्ये मुलांचे गुलाबाचे फुल देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले होते.

  • आज शाळेच्या पहिल्या दिवशी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्राथमिक शाळा क्र.५१ पिंपळे सौदागर येथील शाळेत नवागत मुलांचे स्वागत नगरसेविका शितल नाना काटे यांच्या हस्ते मुलांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले आणि शालेय वस्तूंचे तसेच पुस्तक वाटप विद्यमान नगरसेविका शितल विठ्ठल ऊर्फ नाना काटे यांच्या हस्ते करण्यात आले.

विद्यार्थ्यांचे अशा वेगळ्या पद्धतीने स्वागत होत असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता. यावेळी सरस्वती पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुरेखा गेगजे (जोशी ) तसेच प्राथमिक व बालवाडी चे सर्व शिक्षक उपस्थित होते.

  • कै श्री भाऊसाहेब तापकीर प्राथमिक शाळेच्या वतीने नवीन शैक्षणिक वर्षाचा शाळेचा आज पहिला दिवस; दोन महिन्याच्या प्रदीर्घ कालावधीनंतर आज विद्यार्थांनी शाळेत पाऊल ठेवले. तर काही नवीन बालके आज प्रथमच शाळेत दाखल झाली. कोणाच्या चेहऱ्यावर कुतूहल, रडके भाव, भेदरलेली स्थिती, तर कुठे नव्या वातावरणाचा आनंद, नवीन शाळेविषयी ओढ अशा वातावरणात आज शाळेचा पहिला दिवस पार पडला.

विद्यार्थाच्या मनामध्ये शाळेविषयी ओढ आणि उत्साह निर्माण करण्यासाठी आज कै श्री भाऊसाहेब तापकीर प्राथमिक विद्यामंदिर तापकीरनगर, काळेवाडी, पुणे या शाळेच्या वतीने “नवागतांचे स्वागत” व पुस्तक वाटपाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते. तोरणे- फुलांच्या माळा लावून शाळा सजविण्यात आली. आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती. ढोल ताश्यांच्या गजरात नवागत विद्यार्थांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले.

  • संस्थेचे सचिव मल्हारी तापकीर यांच्या हस्ते सर्व शिक्षा अभियान अंतर्गत विद्यार्थांना शालेय पाठ्यपुस्तकाचे वाटप करण्यात आले. शाळेच्या पहिल्याच दिवशी पुस्तके मिळाल्याने विद्यार्थीच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता. काही विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. शाळेतील उपशिक्षिका उल्का जगदाळे यांनी शिक्षणाचे महत्व पटवून शाळेत रोज येण्याबाबत आवाहन केले. त्यानंतर खाऊ वाटप करून नियमित शाळा सुरु करण्यात आली.

कार्यक्रमाचे आयोजन शाळेच्या प्र.मुख्याध्यापिका जयश्री पवार यांनी केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुमे यांनी केले यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि त्यांचे पालक उपस्थित होते.

  • पिंपरी चिंचवड परिसर राहटणी, काळेवाडी, तापकीरनगरमधील नवीन काकास इंटरनॅशनल स्कूलमध्ये मुलांचे आनंदात गुलाबाचे फुल देऊन संस्थेच्या वतीने स्वागत करण्यात आले. त्यावेळी संस्थापक अध्यक्ष नवीन भगवान तापकीर, स्वीकृत नगरसेवक विनोद तापकीर, प्रगतीशील शेतकरी ज्ञानेश्वर तापकीर, अर्चना तापकीर, स्कुलचे चिप कॉडीनेटर प्रशांत रेड्डी, उपप्राचार्या वंदना, चिराग फुलसुंदर, गणेश भोसले आदी उपस्थित होते. काकास इंटरनॅशनल ही पिंपरी चिंचवड परिसरातील पहिलीच डिजिटल स्कुल आहे, आज काळाची गरज आहे.

आज मुलांना स्कूल मध्ये जाणे म्हणजे एक डोक्यावर ओझे वाट आहे. मुलांना आजच्या काळात फक्त शनिवार आणि रविवार हे दोनच दिवस जास्त आवडतात. कारण त्या दिवशी स्कुलला सुट्टी असते, म्हणून काका’स इंटरनॅशनल स्कुल मध्ये आल्यावर मुलांना सोमवार ते रविवार सारखेच असणार व मुलांना शाळेची व शिक्षणाची अभ्यासाची गोडी कशी वाढेल? याकडे पूर्ण लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. मुलांची बौद्धिक क्षमता कमी होत चालली आहे. काकास इंटरनॅशनल स्कुलच्या नविन शिक्षण प्रणालीमुळे डिजिटली शिक्षण पद्धतीने मुलांची बौद्धिक क्षमता सुधारेल. मुलांचा शिक्षण क्षेत्राकडे किंबहुना स्कुल आणि शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलेल, असा विश्वास संस्थापक-अध्यक्ष नवीन तापकीर यांना आहे, असे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

जुनी सांगवीतील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या लिटल फ्लॉवर इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये विद्यार्थी प्रवेश जल्लोषात करण्यात आला. विद्यार्थ्यांचे ‘सर्व शिक्षा अभियान प्रगत रेल्वे’च्या संकल्पनेतून साकारलेल्या चित्रकलाकृतीतून आगमन झाले. या अनोख्या स्वागताने चिमुकले भारावून गेले होते.

  • यावेळी संस्थेच्या अध्यक्षा आरती राव, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अतुल शितोळे, तेजल कोळसे-पाटील, सर्व शिक्षकवृंद आदी उपस्थित होते.  रांगोळीच्या पायघड्या घालून आणि गुलाबपुष्प देऊन शाळेच्या मुख्याध्यापकांनी चिमुकल्यांचे उत्साहात स्वागत केले. ‘सर्व शिक्षा अभियान प्रगत रेल्वे’ हे चिमुकल्यांसाठी विशेष आकर्षण होते. त्यांनी खूप धमाल केली. शाळेचे प्रांगण विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने गजबजून गेले होते.

शाळेचा पहिला दिवस मोठ्या उत्साहात सुरू झाला. नव्या पुस्तकांची नवलाई, रांगोळीने सजलेले प्रवेशव्दार आणि हातात गुलाबाचे फूल यामुळे चिमुकले भारावले होते. नव्या ओळखी करण्यात बालचमू मग्न होता. मुलांना शिक्षणाबद्दल गोडी निर्माण व्हावी, शाळेबद्दल आपुलकी वाटावी. या हेतूने मुलांचे कौतुक करण्याबरोबरच ‘सर्व शिक्षा अभियान प्रगत रेल्वे’ संकल्पना राबवून चिमुकल्यांचे स्वागत करण्यात आले. ‘मिकी माउस’च्या हातात हात देऊन चिमुकले आनंद लुटत होते. ‘मिकी माउस’ही चिमुकल्यांचा उत्साह वाढवीत होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.