Pimpri : बँकेची गोपनीय माहिती घेऊन दीड लाखांची फसवणूक; अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – दोन वेगवेगळ्या फोनवरून बोलणाऱ्या व्यक्तींनी बँकेची गोपनीय माहिती घेऊन सुमारे एक लाख 61 हजार 356 रुपये खात्यातून काढून घेतले. ही घटना 4 नोव्हेंबर रोजी दुपारी चारच्या सुमारास उद्यमनगर पिंपरी येथे घडली.

याप्रकरणी 43 वर्षीय इसमाने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार 6399761793 आणि 7467809160 या क्रमांकावरून बोलणाऱ्या व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चार नोव्हेंबर रोजी सायंकाळी चार ते साडेचार या कालावधीत फिर्यादीला 6399761793 आणि 7467809160 या क्रमांकावरून फोन आले.

फोनवरील व्यक्तींनी फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून त्यांच्या एचएसबीसी बँक व जनता बँकेच्या कार्डची माहिती घेतली. त्या माहितीच्या आधारे फिर्यादी यांच्या परस्पर त्यांच्या खात्यावरून सुमारे 1 लाख 61 हजार 356 रुपये काढून घेत त्यांची फसवणूक केली.

याबाबत फोनवरील व्यक्तींविरोधात माहिती-तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1