Pimpri : पोलीस कर्मचा-याशी विनाकारण हुज्जत घातल्याप्रकरणी एकाला अटक

एमपीसी न्यूज – पाणी पिण्याच्या बहाण्याने येऊन पोलीस कर्मचा-याशी हुज्जत घालून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. ही घटना रविवारी (दि. 8) दुपारी दोन वाजता संत तुकाराम नगर पोलीस चौकी समोर घडली.

अभिमन्यू अर्जुन सिरसाठ (वय 45, रा. संत तुकाराम नगर, पिंपरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार विश्वास कदम यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी आरोपी पाणी पिण्याच्या बहाण्याने संत तुकाराम नगर पोलीस चौकीसमोर आला. त्यावेळी त्याने फिर्यादी पोलीस हवालदार कदम यांच्याशी हुज्जत घातली. तसेच त्यांना शिवीगाळ करत दगड घेऊन त्यांना मारण्याची अंगावर धावून आला. याबाबत गुन्हा दाखल करून अभिमन्यू याला अटक करण्यात आली आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.