Pimpri : महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना उत्तेजक इंजेक्शन आणि गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या एकास अटक

एमपीसी न्यूज – महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना उत्तेजक इंजेक्शन (Pimpri) आणि गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या एकाला खंडणी विरोधी पथकाने पिंपरी येथून अटक केली. त्याच्याकडून 642 ग्रॅम गांजा आणि मेफेनटरमाईन सल्फेट इंजेक्शनच्या 95 बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत.

रवी चंद्रकांत थापा (वय 32, रा. पिंपरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, खंडणी विरोधी पथकातील पोलीस पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वायसीएम हॉस्पिटल समोर गस्त घालत होते. त्यावेळी एक व्यक्ती संशयितपणे थांबला होता. पोलीस आल्याचे दिसताच तो पळून जाऊ लागला. त्यानुसार पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले.

त्याच्याकडे असलेल्या पिशवीची झडती घेतली असता त्यामध्ये 16 हजार 50 रुपये किमतीचा 642 ग्रॅम गांजा आणि 25 हजार 460 रुपये किमतीच्या मेफेनटरमाईन सल्फेट इंजेक्शनच्या 95 बाटल्या आढळल्या. यासह पोलिसांनी आरोपीकडून दोन हजार रुपये रोख रकमेसह एकूण 43 हजार 510 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Pune : 26/11 दहशतवादी हल्ला नाना पटोलेंनीच केला – देवेंद्र फडणवीस

मेफेनटरमाईन सल्फेट इंजेक्शन हे महाविद्यालयीन मुले जिममध्ये जास्तवेळ व्यायाम करता यावा तसेच शरीर चांगले दिसावे यासाठी याचा उपयोग करतात. मात्र डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय (Pimpri) अशी औषधे घेणे आरोग्यासाठी धोकादायक आहे. त्यामुळे अशा औषधांचे परस्पर सेवन करू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

ही कारवाई खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार, सहायक निरीक्षक उद्धव खाडे, सहायक फौजदार अशोक दुधवणे, पोलीस अंमलदार रमेश गायकवाड, निशांत काळे, विजय नलगे, किरण काटकर, सुनील कानगुडे, प्रदीप गुट्टे यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.