Pimpri : पैसे न दिल्याने एकाला बेदम मारहाण; तरुणाला अटक

गुरुवारी सकाळी फिर्यादी ओंकार आरोपीच्या घरी गेले होते. त्यावेळी आरोपीने ओंकार यांच्याकडे पैशांची मागणी केली. आरोपीला पैसे देण्यासाठी ओंकार यांनी नकार दिला. यावरून ओंकार यांना शिवीगाळ करत हाताने मारहाण केली.

एमपीसी न्यूज – पैसे देण्यास नकार दिल्याने एकाला टोकदार वस्तूने वार करून जखमी केले. ही घटना गुरुवारी (दि.6) सकाळी नऊ वाजता पिंपरी येथील भारतनगर झोपडपट्टी येथे घडली. पोलिसांनी याप्रकरणी एकाला अटक केली आहे.

मतीन अकबर कुरेशी (वय 26, रा. भारतनगर झोपडपट्टी, पिंपरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी ओंकार मारुती कामत (वय 17) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी फिर्यादी ओंकार आरोपीच्या घरी गेले होते. त्यावेळी आरोपीने ओंकार यांच्याकडे पैशांची मागणी केली. आरोपीला पैसे देण्यासाठी ओंकार यांनी नकार दिला. यावरून ओंकार यांना शिवीगाळ करत हाताने मारहाण केली.

त्यानंतर टोकदार वस्तूने ओंकार यांच्या हातावर आणि मानेवर मारून जखमी केले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.