Pimpri: महापौर चषक स्पर्धेसाठी एक कोटीचा खर्च!; स्थायी समितीची मान्यता

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या क्रीडा विभागाच्या वतीने महापौर चषक टीन ट्‌वेन्टी क्रीडा स्पर्धा राबविण्यात येणार आहेत. त्यासाठी तब्बल 65 लाखांची पीटी गणवेश किट आणि 40 लाखांच्या ट्राफी खरेदी करण्यात येणार आहे. याबाबतच्या खर्चाच्या प्रस्तावाला आज (बुधवारी) झालेल्या स्थायी समिती सभेत मान्यता देण्यात आली. दरम्यान, महापौर चषक स्पर्धेसाठी पॉन्सर शोधणार असल्याचे सांगितले होते. परंतु, आता महापालिकेच्या पैशांतून स्पर्धा घेतली जाणार आहे.

महापालिकेच्या क्रीडा विभागाच्या वतीने 12 जानेवारी 2020 मध्ये शहर पातळीवरच 17 क्रीडा प्रकारांमध्ये शालेय महापौर चषक टीन 20 क्रीडा स्पर्धा भरविण्यात येणार आहेत. या सपर्धेमध्ये मैदानी खेळ, फुटबॉल, कबड्डी, खो-खो, बुद्धिबळ, बॅडमिंटन, व्हॉलीबॉल, जलतरण, स्केटिंग, हॉकी, कुस्ती, थ्रोबॉल, योगा, क्रिकेट, बास्केटबॉल, हॅन्डबॉल आणि कराटे अशा 17 प्रकारांत विद्यार्थी खेळाडू मैदानात उतरणार आहेत. त्यासाठी खेळाडूंना पीटी गणवेश व बूट देण्यात येणार आहे. ही स्पर्धा बालेवाडी येथील मैदानामध्ये होणार आहे.

खेळाडूंना आवश्‍यक पीटी गणवेश खरेदीसाठी महापालिकेने 65 लाक 20 हजार 300 रुपयांची निविदा प्रसिद्ध केली होती. विशाल एंटरप्रायजेस, शिवसमर्थ एंटरप्रायजेस आणि साई सेवा एंटरप्रायजेस यांच्या निविदा प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी साई सेवा एंटरप्रायजेस यांच्या 63 लाख 34 हजार रुपयांची प्राप्त झालेली निविदा अंदाजपत्रकिय 65 लाख 20 हजार रुपपयांपेक्षा 2.84 टक्के कमी व लघुत्तम आहे. त्यामुळे त्यांची निविदा स्वीकृत करण्यात आली आहे. त्यांच्यासोबत करारनामा करण्यास स्थायी समितीने मान्यता दिली. त्याचबरोबर भोसरीतील एस्पायर इंडिया यांच्याकडून 40 लाख रुपयांच्या ट्रॉफी खरेदी करण्यास देखील स्थायी समितीने मान्यता दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.