Pimpri : रेल्वेच्या धडकेत एकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – धावत्या रेल्वेखाली सापडून एकाचा मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या व्यक्तीची ओळख पटली नाही. ही घटना कासारवाडी येथे गुरुवारी (दि. 5) दुपारी घडली.

रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे लोणावळा मार्गावर एका रेल्वेगाडीखाली सापडून गुरुवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास अनोळखी व्यक्‍तीचा मृत्यू झाला. मयत व्यक्‍तीचे वय अंदाजे 32 वर्ष असून उंची पाच फूट चार इंच आहे. वर्ण काळा सावळा असून अंगात राखाडी रंगाचा पूर्ण बाह्यांचा शर्ट आणि काळसर रंगाची जिन्स पॅंट असा वेश परिधान केला आहे.

वरील वर्णनाच्या व्यक्‍तीबाबत काही माहिती असल्यास नागरिकांनी पिंपरी रेल्वे चौकीशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस हवालदार मिलिंद गायकवाड यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.