Pimpri : बस प्रवासादरम्यान महिलेचे एक लाख 40 हजारांच्या दागिन्यांवर चोरट्याचा डल्ला

एमपीसी न्यूज – बसमधून प्रवास करत असलेल्या महिलेचे एक लाख 40 हजारांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. ही घटना गुरुवारी (दि. 26) दुपारी साडेबारा ते एकच्या सुमारास वडगाव मावळ ते मोरवाडी, पिंपरी या प्रवासादरम्यान घडली.

कविता अरुण ढमाले (वय 43, रा. मोरवाडी, पिंपरी) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ढमाले या गुरुवारी दुपारी साडेबारा ते एकच्या सुमारास वडगाव मावळ ते मोरवाडी, पिंपरी असा बसमधून प्रवास करीत होत्या. त्यावेळी चोरट्यांनी त्यांची पाच तोळे सोन्याची एक लाखाची सोनसाखळी दोन तोळे सोन्याची 40 हजारांची अंगठी चोरून नेली. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.