Pimpri : निगडी, चिखली, देहूरोड परिसरातून एक लाखांच्या दुचाकी चोरल्या!; अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – शहरात वाहनचोरी करणारी टोळी सक्रिय झाली आहे. निगडी, चिखली आणि देहूरोड परिसरातून एक लाख पाच हजार रुपयांच्या तीन दुचाकी चोरल्या आहेत. याबाबत सोमवारी (दि. 18) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

प्रवीण उत्तम सांकुरडे (वय 29, रा. सहकारनगर, पुणे) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रवीण यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, रविवारी (दि. 17) सकाळी पावणेबारा ते दुपारी पावणेदोन या कालावधीत प्रवीण यांनी त्यांची 35 हजार रुपये किमतीची एम एच 13 / सी एन 9913 ही दुचाकी यमुनानगर येथे पार्किंगमध्ये लावली होती. अज्ञात चोरट्याने ती दुचाकी चोरून नेली. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

जीत राजेश सिंग (वय 23, रा. कृष्णायन सोसायटी, कृष्णानगर, चिंचवड) यांनी चिखली पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात फिर्याद दिली आहे. जीत यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, जीत यांनी त्यांची 50 हजार रुपये किमतीची एम एच 14 / एफ क्यू 5370 ही पल्सर दुचाकी सोसायटीच्या पार्किंगमध्ये शनिवारी (दि. 16) दुपारी चारच्या सुमारास पार्क केली. रात्री अज्ञात चोरट्यांनी दुचाकीचे लॉक तोडून दुचाकी चोरून नेली. रविवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

अर्जुन रामू कडू (वय 60, रा. रुपीनगर, तळवडे) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अर्जुन यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, अर्जुन यांनी त्यांची 20 हजार रुपये किमतीची एम एच 14 / झेड 6185 ही दुचाकी राहत्या घराच्या पार्किंगमध्ये पार्क केली अज्ञात चोरट्याने दुचाकी चोरून नेली. ही घटना 4 ते 7 नोव्हेंबर या कालावधीत घडली. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.