Pimpri : महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस एक लाखाची मदत

एमपीसी न्यूज -देशावर आलेल्या कोरोना संकटांला सामोरे जात असताना शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत वीज उद्योगातील महावितरण, महापारेषण, महानिर्मिती या वीज कंपनीतील असंघटित वीज कंत्राटी कामगारांच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 1 लाख रूपयांचा निधी दिला आहे.

याप्रसंगी संघटनेचे पदाधिकारी अध्यक्ष निलेश खरात, सरचिटणीस सचिन मेंगाळे, कार्याध्यक्ष उमेश आणेराव, संघटन मंत्री राहुल बोडके, कोषाध्यक्ष सागर पवार, व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

पगाराला उशीर होत असला तरी संयम बाळगू, कोणी ही काम बंद करू नये. आज देशाला व देशवासियांना आपली गरज आहे. राष्ट्रहित, उद्योगहित, व कामगारहित ही त्रीसूत्री भारतीय मजदूर संघाने आजवर जपली आहे. या पुढे देखील आपण जपत राहू, असे आवाहन संघटनेचे अध्यक्ष नीलेश खरात यांनी केले आहे.

वीज उद्योगातील कंत्राटी कामगार तुटपुंज्या पगारावर जीव धोक्यात घालून जनतेला अत्यावश्यक सेवा देत असतात.सेवा पुरवठा करत असताना नुकतेच 2 कामगार मृत्युमुखी पडले आहेत, त्यांना 50 लाखांचा विमा मिळावा. तसेच कंत्राटदारांचा मनमानी कारभार चालू आहे, सुरक्षा साधनासाठी 1000 रुपये देण्यास सांगून सुद्धा अजून पैसे मिळाले नाही.

 

अनेक कामगारांचे राज्यभर 1 ते 2 महिने पगार झाले नाहीत. या प्रकरणाची दखल ऊर्जामंत्र्यांनी घ्यावी तसेच या समस्या सोडविण्या करिता एक स्वतंत्र कक्ष व अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.