Pimpri: कोरोनाचा आणखी एक ‘पॉझिटीव्ह’ रुग्ण, बाधितांची संख्या 12 वर

फिलिपिन्स येथून आलेल्या व्यक्तीला कोरोना विषाणूची बाधा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून रुग्णाच्या संख्येत वाढ होत आहे. आज (शुक्रवारी) कोरोनाचा आणखी एक रुग्ण ‘पॉझिटीव्ह’ आढळला आहे. बाधितांची संख्या 12 वर गेली आहे. संबंधित रुग्ण हा फिलिपिन्स येथून प्रवास करून आलेला आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड मिळून कोरोनाबाधितांची संख्या आता 21 झाली आहे. राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 52 पर्यंत वाढली आहे.

कोरोना आजाराचे संक्रमण थांबविण्यासाठी अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये. तसेच फ्लूसारखी लक्षणे दिसून आल्यास नागरिकांनी तात्काळ वैद्यकीय तपासणी करुन घ्यावी. चीन, डेमोक्रेटिक रिपब्लीक ऑफ कोरिया, फ्रान्स, जर्मनी, स्पेन, इटली, इरान, दुबई, सौदी अरेबिया व युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका या देशांमधून आलेल्या सर्व नागरिकांनी किमान 14 दिवस घरांमध्येच होम ‘क्वॉरनटाईन’ करावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

संबंधित आणखी बातम्या

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.