Pimpri : साईड देण्याच्या कारणावरून तिघांकडून एकाला मारहाण

एमपीसी न्यूज – रस्त्यावरून जाताना साईड न दिल्याने रिक्षाचालकाने आणि त्याच्या दोन साथीदारांनी एकाला मारहाण केली. यामध्ये इसम गंभीर जखमी झाला. ही घटना सोमवारी (दि. २९) दुपारी दोनच्या सुमारास संत तुकारामनगर येथे घडली.

दिलीप कस्तुर देहाडे (वय 40, रा. नेहरूनगर पिंपरी) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार रिक्षाचालक आणि त्याच्या दोन साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिलीप सोमवारी दुपारी त्यांच्या मुलांसोबत संत तुकाराम नगरमधील डॉ. डी वाय पाटील पब्लिक स्कूल समोरून जात होते. त्यावेळी मागून येणाऱ्या रिक्षाला त्यांनी साईड न दिल्याने रिक्षाचालकाने त्यांच्याशी वाद घातला. रिक्षाचालक आणि त्याच्या दोन साथीदारांनी मिळून दिलीप यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

तसेच एकाने त्यांच्यावर कोयत्याने वार केले. यामध्ये दिलीप गंभीर जखमी झाले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.