Pimpri : मॉर्निंग वॉकसाठी निघालेल्या ज्येष्ठ नागरिकाला धमकावून लुटले

एमपीसी न्यूज – मॉर्निंग वॉकसाठी निघालेल्या ज्येष्ठ नागरिकाला लोखंडी रॉडने मारण्याची धमकी देत लुटले. ही घटना रविवारी (दि. 4) सकाळी सव्वासहाच्या सुमारास एस एस बी पी शाळेसमोर घडली.

श्रीपाद नारायण एरंडे (वय 62, रा. मोरवाडी पिंपरी) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी श्रीपाद रविवारी सकाळी मॉर्निंग वॉकसाठी गेले. ते मोरवाडी येथील एस एस बी पी शाळेसमोर आले असता दुचाकीवरून आलेल्या तीन जणांनी त्यांना लोखंडी रॉडने मारण्याची धमकी दिली आणि त्यांच्या हातातील आठ ग्रॅम वजनाची 35 हजार रुपये किमतीची अंगठी जबरदस्तीने चोरून नेली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

दुचाकीस्वाराला अडवून जबरदस्तीने मोबाईल आणि रोकड हिसकावली

अज्ञात चोरट्यांनी दुचाकीस्वाराला अडवून त्याच्याकडून जबरदस्तीने 5 हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन आणि 1 हजार 750 रुपयांची रोकड जबरदस्तीने चोरून नेली. ही घटना सीएनजी पंप रोड मोशी येथे 31 जुलै रोजी रात्री आठच्या सुमारास घडली. संतोष सदाशिव (वय 33, रा. मोशी) यांनी याप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.