Pimpri: कॅप जेमीनी कंपनीकडून महापालिकेला एक हजार पीपीई किट

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या पार्श्वभुमीवर कॅप जेमीनी टेक्नॉलॉजिक लिमिटेड या कंपनीकडून सीएसआर माध्यमातून पिंपरी-चिंचवड महापालिकेला एक हजार पीपीई किट देण्यात आल्या आहेत.

कंपनीचे केंद्र प्रमुख मनीष मेहता यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी वायसीएम रुग्णालयाकरीता वाटपासाठी सदर किट सुपुर्द केले.

यावेळी अतिरीक्त आयुक्त संतोष पाटिल, अजित पवार, सहाय्यक आयुक्त चंद्रकांत इंदलकर कंपनीचे प्रतिनिधी विनय शेट्टी, हरीष उमाप, भिमराव कांबळे उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.