Pimpri : बारावीचा शहराचा निकाल ८९.०९ टक्के; मोबाईलमुळे सायबर कॅफे पडले ओस

एमपीसी न्यूज – फेब्रुवारी-मार्च २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा ऑनलाइन निकाल आज मंगळवारी दुपारी लागला. पिंपरी-चिंचवड शहराचा निकाल ८९.०९ टक्के लागला. या निकालाची उत्कंठा विद्यार्थ्यांसह पालकांनाही लागली होती. आॅनलाइन निकाल जाहीर झाले अन् राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत वेबसाईट्सही काही काळापुरत्या झाल्या होत्या. मोबाईल वरही निकाल पाहता यावा, यासाठी मंडळाने सोय केली होती. किती मार्क मिळाले? हे पाहून विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहात होता. एकूणच यंदाच्या निकालांमुळे विद्यार्थ्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण दिसून येत आहे.

दरवर्षी सायबर कॅफेमध्ये निकालाच्यावेळीस गर्दी पहायला मिळत होती. पण, सध्या नेटवर्किंगच्या जमान्यात सायबर कॅफे मागे पडले. त्यामुळे सायबर कॅफेही काही ठिकाणी ओस पडले होते. क्वचितच एखादे दुसरा विद्यार्थी सायबर कॅफेमध्ये पाहण्यास मिळत होते. दुपारी एक वाजल्यानंतर सगळ्या विद्यार्थ्यांनी आपल्या मोबाईलवरुन निकाल पाहण्यास पसंती दिली. कोणाला किती मार्क पडले? याची चर्चा मित्र-मैत्रिणींच्यावर ग्रुपवर सुरु होती. काही ठिकाणी मित्रमैत्रिणीच्या घरी रिझल्ट पहाण्यासाठी जात होते. एक वाजता इंटरनेटवर निकाल उपलब्ध झाला आणि यश मिळालेल्या विद्यार्थ्यांचा जल्लोष सुरू झाला.

  • सगळ्यांकडेच मोबाईल असल्याने काही ठिकाणी मोबाईल हॅंग झाल्य़ाचे चित्र पहावयास मिळत होते. साहजिकच कॉलेजांमधे गदीर् नव्हती. कॉलेजे सुनीसुनी दिसत होते. आणि मोबाईल हॅंग झाल्याचे पहायला मिळत होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.