Pimpri: कंकणाकृती ग्रहणावर सायन्स पार्कतर्फे उद्या ऑनलाईन व्याख्यान

Pimpri: Online lecture by Science Park tomorrow on solar eclipse दि. 21 जून रोजी होणाऱ्या कंकणाकृती सूर्य ग्रहणावर आधारित या व्याख्यानाचा नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

एमपीसी न्यूज- पिंपरी चिंचवड येथील सायन्स पार्कतर्फे रविवारी (दि.14) रोजी ‘कंकणाकृती ग्रहण’ या विषयावर विज्ञान व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.

चिंचवड येथील सायन्स पार्कच्या सभागृहात सायंकाळी सहा वाजता खगोल तज्ज्ञ सारंग ओक हे व्याख्यान देणार आहेत. यामध्ये सहशहर अभियंता प्रवीण तुपे यांचा सहभाग असणार आहे.

दि. 21 जून रोजी होणाऱ्या कंकणाकृती सूर्य ग्रहणावर आधारित या व्याख्यानाचा नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

https://global.gotomeeting.com/join/605849437 या लिंकवर क्लिक करून नागरिकांना या व्याख्यानात सहभागी होता येणार आहे. अधिक माहितीसाठी 9552994294 या नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.