Pimpri : महापालिका तिजोरीत 160 कोटी रुपयांचा ‘ऑनलाईन’ कराचा भरणा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने नऊ वर्षापूर्वी सुरु करण्यात आलेल्या ‘ऑनलाईन’ मालमत्ता कर भरणा सुविधेला शहरवासियांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. घरबसल्या एका ‘क्लिक’वर कर भरणा-यांच्या संख्येत दरवर्षी दुपटीने वाढ होत आहे. चालू 2018-19 या आर्थिक वर्षात डिसेंबरअखेर तब्बल 1 लाख 28 हजार 111 मिळकतधारकांनी 159 कोटी 52 लाख रुपयांचा कर ऑनलाईन पद्धतीने भरला आहे.

नागरिकांना करभरणा सहज करता यावा यासाठी महापालिकेची शहरात 16 करआकारणी व करसंकलन विभागीय कार्यालये आहेत. रोख, धनादेश, डिमांड ड्राफ्टद्वारे कराचा भरणा करण्याची सुविधा महापालिकेने करुन दिली आहे. याशिवाय महापालिकेने सन 2009-10 मध्ये ‘ऑनलाईन’ कर भरण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली. त्यानंतर प्रत्येक वर्षी ऑनलाईन कर भरणा-यांच्या संख्येत दुपटीने वाढ होत आहे. ऑनलाईन कराचा भरण्याच्या सुविधेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून दिवसेंदिवस ऑनलाईन कर भरणा-यांची संख्या वाढत आहे.

पहिल्याच वर्षी 2009-10 मध्ये 3 हजार 835 मिळकतधारकांनी एकूण 2 कोटी 11 लाखांचा ऑनलाईन पद्धतीने भरणा केला होता. त्यानंतर 2010-11 मध्ये 9 हजार 338 मिळकतधारकांनी 7 कोटी 29 लाख, 2011-12 मध्ये 15 हजार 783 मिळकतधारकांनी 13 कोटी 62 लाख, 2012-13 मध्ये 28 हजार 966 मिळकतधारकांन 26 कोटी 96 लाख, 2013-14 मध्ये 47 हजार 529 मिळकतधारकांनी 46 कोटी 97 लाख, 2014-15 मध्ये 61 हजार 913 मिळकतधारकांनी 64 कोटी 68 लाख , 2015-16 मध्ये 76हजार 390 मिळकतधारकांनी 80 कोटटी 55 लाख, 2016-17 मध्ये 87 हजार 355 मिळकतधारकांनी 85 कोटी 17 लाख, 2017-18 मध्ये 1 लाख 24 हजार 592 मिळकतधारकांनी 145 कोटी 25 लाख, तर 2018-19 मध्ये डिसेंबरअखेर 1 लाख 28 हजार 111 मिळकतधरकांनी 159 कोटी 52 लाखांचा भरणा करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.