Pimpri : कै.श्री.ग.माजगावकर भाषा, संस्कृती संवर्धन केंद्राचा सोमवारी उदघाटन

एमपीसी न्यूज – क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती संचलित पुनरुत्थान समरसता गुरुकुलम् आयोजित कै. श्री. ग माजगावकर भाषा व संस्कृती संवर्धन केंद्राचा उद्घाटन सोहळा सोमवार (दि. 6 मे) होणार आहे, अशी माहिती गुरुकुलमचे अध्यक्ष गिरीश प्रभुणे यांनी दिली.

चिंचवड येथील पुनरुत्थान समरसता गुरुकुलम् येथे सोमवारी (दि. 6 मे) सायंकाळी सहा वाजता संवर्धन केंद्राचे उद्घाटन होणार आहे. या केंद्राचे उद्घाटन मराठी साहित्य संमेलन अध्यक्ष अरुणा ढेरे यांच्या हस्ते होणार आहे. मराठी साहित्य संस्कृती अभ्यासक डॉक्टर सदानंद मोरे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

  • यावेळी ज्येष्ठ अभ्यासक विचारवंत रमेश पतंगे, संघ प्रांत कार्यवाह डॉ. प्रवीण दबडघाण, दिलीप माजगावकर आदी उपस्थित राहणार आहेत. यावेळी पुनरुत्थान समरसता गुरुकुलमचे अध्यक्ष गिरीश प्रभुणे कार्यवाह अॅड.सतीश गोरडे प्रधानाचार्य पूनम गुजर व आदी कार्यकारिणी उपस्थित राहणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.