Pimpri : पोलिस आणि नागरिक मित्र मध्यवर्ती कार्यालयाचे उदघाटन

एमपीसी न्यूज – कै. तुकाराम तनपुरे फाऊंडेशन व पोलीस नागरिक मित्र यांच्या संयुक्त विद्यमाने फाऊंडेशनच्या  सभासदांना ओळखपत्र वाटप करण्यात आले. कै. तुकाराम तनपुरे फाऊंडेशन संचलित पोलिस व नागरिक मित्र यांच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उदघाटन परिमंडळ एकच्या उपआयुक्त स्मार्तना पाटील, वाहतुक विभागाच्या उपआयुक्त निलीमा जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. 

यावेळी परिमंडळ एकच्या उपआयुक्त स्मार्तना पाटील, वाहतुक विभागाच्या उपआयुक्त निलीमा जाधव,   पीसीसीएफचे सूर्यकांत मुथियान, राजीव भावसार,  तनपुरे फाऊंडेशनचे अध्यक्ष अनिल पालकर, प्रकाश मिर्झापुरे, अनिल काळे, चंद्रकांत पवार, विठ्ठल सहाणे, विजय इंगळे, सुधीर जमदाडे, कल्पना भाईंगडे, वंदना साखरे, शिला कार्लेकर, मंगेश कवी,  लक्ष्मण शिंदे, अरुण पाटील, किशोरी शहाणे, सविता बकरे आदी उपस्थित होते.

  • परिमंडळ एकच्या उपायुक्त स्मार्तना पाटील म्हणाल्या की,  पिंपरी-चिंचवड शहराचा  स्मार्ट सिटी आहे. या स्मार्ट सिटीत पोलिस दलही हायटेक झाले आहे. स्मार्टसिटी बरोबरच शहर भयमुक्त करण्य़ात येईल.

वाहतुक विभागाच्या उपआयुक्त निलिमा जाधव म्हणाल्या, महापालिका आणि लगतच्या हद्दीत वाहतूक सुरळीत होणे आवश्यक आहे. नागरिकांना वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही, त्या दृष्टीने वाहतूक पोलिसांनी योग्य नियोजन करणे आवश्यक आहे, अशा सूचना या वेळी करण्यात आल्या.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिल पालकर यांनी केले. सूत्रसंचालन चंद्रकांत पवार यांनी केले. आभार दत्ता अवसरकर यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.