Pimpri : मगर स्टेडियम पाडण्यास विरोध – भारती चव्हाण

एमपीसी न्यूज – नेहरूनगर येथील कै. अण्णासाहेब मगर स्टेडियमची इमारत पाडण्यास कामगार कल्याण मंडळाने विरोध दर्शविला आहे. महापालिकेने याबाबतची प्रक्रिया तातडीने थांबवावी, अशी मागणी मंडळाच्या सदस्या भारती चव्हाण यांनी केली.

_MPC_DIR_MPU_II

नेहरूनगर येथील कै. अण्णासाहेब मगर स्टेडियमची इमारत पाडण्यास महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत नुकतीच मंजुरी देण्यात आली. वास्तविक, स्टेडियमची इमारत आणि जागा कामगार कल्याण मंडळाच्या मालकी हक्काची आहे. ती 27 वर्षांपूर्वी पालिकेकडे हस्तांतर केली होती. त्या मोबदल्यात पालिका काही जागा मंडळाला देणार होती; परंतु, त्याची पूर्तता झाली नाही. त्यामुळे स्टेडियम पुन्हा ताब्यात मिळावे, अशी मागणी मंडळाने केली होती.

त्यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. परंतु, कामगार कल्याण मंडळाला विश्वासात न घेता त्यांचे हक्क डावलून महापालिका प्रशासनाने स्टेडियम पाडण्याबाबत निविदा प्रक्रिया राबविण्याची कार्यवाही चालू केली आहे. ती बेकायदेशीर असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1