BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri: शास्तीकर माफीसाठी महापालिका प्रवेशद्वारासमोर विरोधकांचे आंदोलन

'गाजर' हातात घेऊन सत्ताधाऱ्यांचा केला निषेध

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील अवैध बांधकामांचा शास्तीकर माफ करावा, अनियमित बांधकामे नियमितीकरण, रेडझोन, रिंग रोडबाबतच्या प्रश्नांकडे सत्ताधारी भाजप आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी, भाजपने दिलेल्या आश्वासनांची आठवण करुन देण्यासाठी विरोधी पक्ष, विविध सामाजिक संघटनांच्या वतीने आज (सोमवारी) महापालिका प्रवेशद्वारासमोर आंदोलन करण्यात आले. ‘गाजर’ हातात घेऊन सत्ताधाऱ्यांचा निषेध केला.

या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते दत्ता साने, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, शहरप्रमुख योगेश बाबर, काँग्रेस शहराध्यक्ष सचिन साठे, मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले, शेकापचे हरीष मोरे, स्वराज इंडिया अभियानाचे मानव कांबळे, सामाजिक कार्यकर्ते मारूती भापकर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला शहराध्यक्ष वैशाली काळभोर, नगरसेविका वैशाली घोडेकर, अनुराधा गोफने, प्रज्ञा खानोलकर, संगीता ताम्हाणे, वर्षा जगताप, नगरसेवक श्याम लांडे, विक्रांत लांडे, माजी विरोधी पक्षनेते तात्या तापकीर, अरुण बोऱ्हाडे, फजल शेख, माजी नगरसेविका मंदा आल्हाट, छावा संघटनेचे अध्यक्ष धनाजी येळकर, मराठा सेवा संघाचे प्रकाश जाधव, रोमी संधू, राजू सावळे तसेच विविध पक्ष आणि सामाजिक संस्थांचे पदाधिकारी हातात ‘गाजर’ घेऊन सहभागी झाले आहेत.

  • महापालिका, नवनगर विकास प्राधिकरण, एमआयडीसी आणि म्हाडा क्षेत्रातील वर्षानुवर्षे भिजत पडलेल्या संपूर्ण शास्तीकर माफी, अनियमित बांधकामे नियमितीकरण, रेड झोन, रिंग रोड असे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी-चिंचवडकरांची शास्तीची धास्ती 15 दिवसात घालवू या..! दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केली नाही.

… मुदत संपली तरी प्रश्न सुटेना!
अनधिकृत बांधकामे नियमितीकरण आणि शास्तीकर माफीबाबत दिलेला शब्द पाळला नाही. 9 जानेवारीला चिंचवडमधील जाहीर कार्यक्रमात पिंपरी-चिंचवडकरांची शास्तीची धास्ती 15 दिवसात घालवू, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी आश्वासन दिले होते. ही मुदत 24 जानेवारीलाच संपली आहे. मात्र, प्रश्न सुटला नाही. त्यामुळे ही घोषणाही ‘गाजर’च निघाले. या आश्‍वासनाची आठवण करुन देण्यासाठी हे आंदोलन करण्यात येत असल्याचे, आंदोलकांनी सांगितले आहे.

HB_POST_END_FTR-A4

.