Pimpri : आपत्ती व्यवस्थापन व पुनर्वसन विभागाला सज्ज राहण्याचे आदेश द्या – गणेश बाबर

Order Disaster Management and Rehabilitation Department to be ready - Ganesh Babar

एमपीसी न्यूज – आगामी पावसाळा लक्षात घेऊन राज्यातील आपत्ती व्यवस्थापन व पुनर्वसन विभागाला सज्ज राहण्याचे आदेश द्यावेत,  अशी मागणी राज्य कृषी पदवीधर युवक संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष गणेश बाबर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

या पत्रात बाबर  यांनी म्हटले आहे की, राज्यभर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून राज्यातील आरोग्य यंत्रणा, पोलिस यंत्रणा, महसूल व आपत्कालीन व्यवस्थापन विभाग तसेच विभागीय स्तरावरील अधिकारी,  जिल्हाधिकारी, अंगणवाडी सेविका, शिक्षक , स्थानिक स्वराज्य संस्था या संसर्गाच्या व्यवस्थापनेसाठी व्यस्त आहेत.

या पार्श्वभूमीवर राज्य व केंद्राकडून येणाऱ्या सूचना नागरिकांना करणे तसेच त्यांचे पालन करून घेण्यासाठी आरोग्य विभाग व्यस्त आहे व मनुष्यबळ ही अपुरे पडत आहे.

दरम्यान, आगामी पावसाळ्याच्या तोंडावर मागील वर्षी प्रमाणे पूर परिस्थिती व इतर आपत्ती व्यवस्थापनाच्या दुष्टीकोनातून राज्यातील आपत्ती व्यवस्थापन व पुनर्वसन विभागाला सज्ज राहण्याचे आदेश द्यावेत.

कोल्हापूर, सांगली, सातारा, जिल्ह्यात मागच्या पुराच्या पाण्याने मोठी आर्थिक व जीवीत हाणी झाली होती. त्यामुळे, अधिक काळजी घेऊन या विभागांनी सतर्क राहण्याची गरज आहे.

  कोरोना संकट आणि आगामी पावसाळा यामुळे प्रशासनासमोर दोन्ही परिस्थितीनांं यशस्वी तोंड देण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे. मनुष्यबळाची कमतरता सुद्धा भासू शकते त्यामुळे सरकारने वेळीच सावध होऊन पावसाळ्यापूर्वी संबंधित विभागांना सतर्क राहण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी बाबर यांनी केली आहे.

राज्य कृषी पदवीधर संघटनेच्यावतीने सातारा जिल्हाअध्यक्ष नितीन निंबाळकर, सातारा जिल्हा कार्याध्यक्ष मिलिंद यादव, राज्य कृषी पदवीधर सचिव प्रकाश यादव, जावळी तालुका अध्यक्ष विठ्ठल रांजणे, वाई तालुका अध्यक्ष धनसिंग कदम, वाई तालुका उपाध्यक्ष प्रवीण बाबर, खटाव तालुका विद्यार्थी अध्यक्ष किरण इंगळे यांनी या मागणीला दुजोरा दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.