Pimpri : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन

एमपीसी न्यूज : रक्त हा जीवनाचा एक अविभाज्य भाग असल्याने त्याची आवश्यकता भासल्यास वणवण हिंडायला लागू नये. ते सहज उपलब्ध व्हायला पाहिजे. त्यासाठी अशी रक्तदान शिबिरे सतत भरवून त्याची चळवळ उभी राहिली पाहिजे. असे उद्गार विधानपरिषदेच्या आमदार उमा खापरे (Pimpri) यांनी सदर प्रसंगी काढले.

देशाचे लाडके पंतप्रधान, कर्मयोगी व राष्ट्रनेता नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त कासारवाडी येथील ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्रात पिंपरी चिंचवड शहर जिल्हा भाजपा चिटणीस देवदत्त लांडे पाटील आणि त्यांच्या मित्रमंडळींनी रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते. सदर शिबीराचे (Pimpri) उद्घाटन माजी नगरसेविका सुजाता पलांडे यांच्या हस्ते करण्यात आले.

Maval : डोणुआई देवी नवरात्रोत्सव समितीच्या अध्यक्षपदी रेणुका वाडेकर यांची निवड

तर, समारोप पिंपरी चिंचवड शहर जिल्हा भाजपा उपाध्यक्ष प्रकाश तात्या जवळकर यांच्या हस्ते करण्यात आले. सदर शिबीरास उमा खापरे, प्रदेश सचिव अमित गोरखे, पिंपरी चिंचवड शहर जिल्हा भाजपा संघटन सरचिटणीस व प्रवक्ते अमोल थोरात, मंडल अध्यक्ष महेंद्र बावीस्कर, प्रा. डॉ. अशोककुमार पगारिया, विलासशेठ पगारिया, सुरेशशेठ गादिया, बापुसाहेब भोसले, जैन संघाचे अध्यक्ष बाळासाहेब लांडे, पै.रतन लांडगे, रघुनाथ जवळकर, आप्पासाहेब धावडे, आबा कोळेकर, रामदास भांडे, सिंगल, संतोष टोणगे, नानासाहेब डवरी, ज्येष्ठ नागरिक संघाचे भोसले, शिंदे, महाले, शेटे, बबनराव टोपे, पंडाराम वेलमुरगन इत्यादी मान्यवर मंडळींनी भेट देऊन शिबिराबद्दल गौरवोद्गार काढले. देवदत्त लांडे यांनी स्वतः रक्तदान करुन एक आदर्श घालून दिला व सर्व रक्तदाते व शिबिर यशस्वी करणाऱ्या कार्यकर्त्यांचे, डॉक्टरांचे व त्यांच्या स्टाफचे, तसेच विरंगुळा केंद्राच्या सर्व पदाधिकारी व सभासदांचे आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.