Pimpri: इस्कॉनच्या वतीने श्री जगन्नाथ रथयात्रा महोत्सवाचे आयोजन

एमपीसी न्यूज – इस्कॉनच्या वतीने श्रीजगन्नाथ रथयात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी (दि. 23) दुपारी 2.30 वाजता दत्त मंदिर, यमुनानगर येथुन या रथयात्रेला सुरुवात होणार आहे. यामध्ये मुंबई येथील इस्कॉनचे अध्यक्ष राधा गोपीनाथ प्रभु यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

तसेच यमुनानगरमधील दत्त मंदिर, निगडीतील मधुकर पवळे पुल, महाराष्ट्र बँक, आकुर्डी, दत्तवाडी, विठ्ठलवाडी, म्हाळसाकांत चौक, संभाजी चौक, बिजलीनगर पुल, आकुर्डी रेल्वे स्टेशन या मार्गाने जाऊन इस्कॉन श्रीगोविंद धाम मंदिर येथे रथयात्रेची सांगता होणार आहे.

या महोत्सवामध्ये श्रीगोविंद धाम मंदिर प्रांगणात सकाळी 8 वाजता मंगल होम यज्ञ होणार आहे. त्यानंतर सायंकाळी 6.30 वाजता भजन, सायंकाळी सात वाजता नाटिका, सायंकाळी 7.30 वाजता जगन्नाथ कथा 8.30 वाजता विशेष दर्शन, आरती आणि 9 वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.