Pimpri : पिंपरी येथे नऊ डिसेंबर रोजी लोकन्यायालयाचे आयोजन

एमपीसी न्यूज –  पिंपरी येथे नऊ डिसेंबर रोजी लोकन्यायालयाचे आयोजनण्यात येणार आहे. यामध्ये वाहतुकीच्या ( Pimpri ) नियमांचे उल्लंघन केल्याबाबत झालेल्या कारवाईची प्रकरणे तसेच इतर विविध प्रकरणे सामंजस्याने आणि तडजोडीने निकाली काढली जाणार आहेत. या लोकन्यायालयाचे आयोजन पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि पिंपरी चिंचवड ॲडव्होकेटस्‌ असोसिएशनच्या वतीने करण्यात आले आहे.

एखादा वाद उद्भवला तर तो सामंजस्याने सोडवावा ही आपली प्राचीन परंपरा आहे. गावातील निःपक्षपाती लोक गावातील वाद सोडवत असत. त्यालाच गाव पंचायत असे म्हटले जात. त्याचं गाव पंचायतचे आधुनिक रूप म्हणजे लोकन्यायालय आहे. लोकन्यायालयात विविध प्रकरणे सामंजस्याने आणि तडजोडीतून निकाली काढली जातात. पक्षकारांचा वेळ आणि पैशांची बचत करून त्यांना न्यायाचा दिलासा देण्याच्या हेतूने पिंपरी न्यायालयात लोकन्यायालय भरवण्यात येणार आहे.

Pimple Gurav : चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्टतर्फे चार युवकांना खाद्यपर्थाची गाडी

वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या वाहन चालकांवर वाहतूक पोलिसांकडून दंडात्मक कारवाई केली जाते. ही दंडाची रक्कम वेळेत भरली नाही तर वाहन मालकाला न्यायालयामार्फत नोटीस पाठवली जाते. त्यानंतर संबंधित वाहन मालकावर कायदेशीर कारवाई केली जाते. ही कारवाई टाळण्यासाठी तसेच दंडाची वसुली होण्यासाठी लोकन्यायालयात अशी प्रकरणे तडजोडीने निकाली काढली जातात.

दंडाच्या एकूण रकमेच्या 50 टक्के रक्कम भरून प्रकरणे निकाली काढता येणार असल्याचे पिंपरी चिंचवड ॲडव्होकेटस्‌ असोसिएशनच्या अध्यक्षा ॲड. प्रमिला गाडे यांनी सांगितले. नागरिकांनी या लोकन्यायालयात सहभागी होण्याचे आवाहन देखील गाडे यांनी केले ( Pimpri ) आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.