Pimpri: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महिलांच्या वतीने दुचाकी रॅलीचे आयोजन

एमपीसी न्यूज – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 128 व्या जयंतीनिमित्त  शहरातील महिलांच्या वतीने दुचाकी रॅली काढण्यात येणार आहे. आंबेडकर जयंतीला निगडी, भक्‍ती-शक्‍ती चौक ते पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा अशी महिलांची दुचाकी रॅली आयोजित करण्यात आली आहे.

याबाबतची माहिती संयोजिका आशा बैसाने यांनी दिली. महिला सक्षमीकरणाचे पुरस्कर्ते असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांना अनेक महत्वाचे अधिकार मिळवून दिले आहेत. मात्र, अनेक महिलांना याची माहिती नाही. डॉ. आंबेडकर यांच्याप्रति असलेला आदरभाव व्यक्‍त करण्यासाठी खास महिलांच्या वतीने दुचाकी रॅली काढण्यासाठी प्रयत्न सुरु होते. या संकल्पनेला महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, अशी माहिती संयोजिक बैसाने यांनी दिली. 14 एप्रिलला दुपारी साडे तीन वाजता भक्‍ती-शक्‍ती चौकातून या रॅलीला सुरुवात होणार आहे.
 आकुर्डी, चिंचवड, मोरवाडी या मार्गे ही रॅली पिंपरीतील डॉ. आंबेडकर पुतळ्याजवळ पोचेले. त्यानंतर महिलांच्या वतीने डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले जाणार आहे.या रॅलीत सहभागी होण्यासाठी 9975772180 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.