BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : आयुर्वेदिक उपचार व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन

एमपीसी न्यूज – डॉ. डी. वाय. पाटील आयुर्वेद रुग्णालयाच्या स्त्री रोग व प्रसुतीतंत्र विभागाच्या वतीने आठ दिवसांच्या कालावधीत सकाळी नऊ ते दुपारी चार या वेळेत वंध्यत्व मोफत मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले आहे. हे शिबिर 13 एप्रिलपर्यंत सुरु राहणार आहे. 
विशेषत यामध्ये पाळी अनियमित होणे, वजन वाढणे, हार्मोन्स असंतुलित होणे या कारणांमुळे वंध्यत्वाची लक्षणे जाणवतात. वंध्यत्व असणा-या स्त्री  व पुरुषांसाठी या सर्व सुविधा डॉ. डी. वाय. पाटील आयुर्वेद रुग्णालयात उपलब्ध आहेत.
तसेच शरीर शुध्दीसाठी उपचार केले जातील. जास्तीतजास्त स्त्री- पुरुषांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन रुग्णालयाच्या वतीने करण्यात आले आहे. इच्छुक रुग्णांनी ओ.पी.डी. नं. दोन मध्ये यावे असे सांगण्यात आले आहे.
HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3