Pimpri: आमदार महेशदादा स्पोट्‌र्स फांऊडेशनतर्फे उद्या भोसरीत इफ्तार पार्टीचे आयोजन

आमदार महेश लांडगे यांची माहिती

एमपीसी न्यूज – मुसलमान समाजाचा पवित्र रमजान महिना सुरू असून उद्या (शनिवारी)आमदार महेशदादा स्पोट्‌र्स फांऊडेशनतर्फे आणि मित्र परिवारातर्फे इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले. या इफ्तार पार्टीला मुस्लिम समाजातील नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आमदार महेश लांडगे यांनी केले.

भोसरीतील इंद्रायणी मंगल कार्यालयात शनिवारी सायंकाळी सहा वाजता इफ्तार पार्टी होणार आहे. यावेळी पालकमंत्री गिरीश बापट, भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, महापौर राहुल जाधव, खासदार अमर साबळे, ज्येष्ठ नेते आझम पानसरे, माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे, अखिल भारतीय ऑलम्पिक महासंघाचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे, माजी महापौर नितीन काळजे, सभागृह नेते एकनाथ पवार, स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन, सहाय्यक पोलीस आयुक्त सतिश पाटील, भोसरीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताडे, चिखलीचे पोलीस निरीक्षक बालाजी सोनटक्के, एमआयडीसीचे राजेंद्र कुटे, निगडीचे सतिश पवार, दिघीचे विवेक लांवड उपस्थित राहणार आहेत.

  • त्यांच्यासोबत शिक्षण मंडळाचे माजी सभापती भाईझान काझी, मुस्लिम महासंघाचे अजहर सिकंदर खान, फारुक ईनामदार, झिशान सय्यद, जहिर सिकिलकर, अस्लम पठाण, हाजी गुलामरसुल सय्यद, हबिबभाई शेख, खाजाभाई शेख, फय्याज सनदी उपस्थित राहणार आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरातील मुस्लीम नागरिकांनी इफ्तार पार्टीला उपस्थित रहावे, असे आवाहन आमदार महेश लांडगे यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.