Pimpri : ऑक्सफॅम ट्रेलवॉकर्स स्पर्धेत इटन इंडिया इनोव्हेशन सेंटरच्या अभियंत्यांचे यश

एमपीसी न्यूज- ऑक्सफॅम इंडिया या स्वयंसेवी संस्थेने मुंबई जवळील कर्जत आणि आसपासच्या दुर्गम, नयनरम्य परिसरात 48 तासांत 100 किलोमीटर आणि 24 तासांत 50 किलोमीटर चालण्याची आव्हानात्मक स्पर्धा 13-14 डिसेंबर रोजी आयोजित केली होती. या स्पर्धेत पुण्यातील इटन इंडिया इंनोव्हेशन सेंटरच्या चार अभियंत्यांनी ही स्पर्धा पहिल्याच प्रयत्नात निर्धारित वेळेआधी यशस्वीपणे पूर्ण केली.

या स्पर्धेत 100 किलोमीटर अंतरासाठी 120 संघ तसेच 50 किलोमीटर अंतरासाठी 80 संघांनी नोंदणी केली होती. मानसिक आणि शारीरिक क्षमतेचा कस पाहणारी म्हणून ही स्पर्धा जगभरात प्रसिद्ध आहे. ही स्पर्धा पूर्ण करण्यासाठी 48 तासांचा वेळ देण्यात आला होता.

सोहन सोनटक्के – वरिष्ठ अभियंता (ऐरोस्पेस विभाग), योगेश साठे – वरिष्ठ व्यवस्थापक (ऐरोस्पेस विभाग), वीरेंद्र गायकवाड – वरिष्ठ व्यवस्थापक, (इलेक्ट्रिकल विभाग), श्रीकांत केत – व्यवस्थापक (ऐरोस्पेस विभाग) या अभियंत्यांनी निर्धारित वेळेपूर्वी 34 तासात ही स्पर्धा पूर्ण केली.

ऑक्सफॅम इंडिया ट्रेलवॉकर हे एक सांघिक आव्हान असून त्याद्वारे निधी संकलन कार्यक्रम घेतला जातो. या स्पर्धेत 1 लाख 51 हजार 711 रुपयांचा निधी संकलित करण्यात आला. संघांद्वारे जमा केलेली रक्कम बिहार, छत्तीसगढ, झारखंड, आसाम, ओडिशा आणि उत्तर प्रदेश या सहा गरीब राज्यांमध्ये आर्थिक, सामाजिक आणि लैंगिक असमानतेविरुद्ध लढा देण्यासाठी, शिक्षण आणि सर्वांसाठी आरोग्याच्या अभियानासाठी वापरली जाते.

संघाच्या या उत्कंठावर्धक आणि दीर्घ प्रवासात विश्वास सूर्यवंशी, राजेश काळभोर, मयूर कोठारी, चंद्रशेखर भोरे, प्रियांका अनंथा, अजिथ के आर, रणजित जाधव, आम्रपाली महाजन, विशाखा हरलापूर, निखिल तिलकपुरे, सुदर्शन गवळी, चिदानंद कोरे, हर्षद पवळे, इला बर्षीला, योगेश शिंदे यांनी वेळोवेळी शारीरिक, मानसिक तसेच निधी संकलनासाठी उदभवलेल्या आर्थिक आव्हानांवर मात करण्यात मदत केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.