Pimpri : पांडुरंग भालेकर यांनी 21 कामगार कुटुंबांना केले अन्नधान्यांचे वाटप

एमपीसी न्यूज- देशात लाॅकडाऊन लागू करून पाच दिवस उलटून गेले आहेत. त्यामुळे इतर राज्यातील व अन्य जिल्ह्यातून पोटापाण्यासाठी महाराष्ट्रात आलेले कामगारांवर कंपन्या बंद असल्यामुळे उपासमारीची वेळ आली आहे. अशा 21 कुटुंबांना नगरसेवक पांडुरंग भालेकर यांनी अन्नधान्याचे वाटप केले.

पांडुरंग भालेकर यांनी एक हात मदतीचा हा उपक्रम राबवत 21कुटुंबाना मोफत अन्नधान्याचे वाटप केले आहे. स्व:खर्चाने उपलब्ध करून दिलेला हा अन्नधान्याचा साठा पंधरा दिवस पुरेल एवढा आहे. यामध्ये पीठ, तांदूळ, साखर, डाळ, मीठ, चहापावडर, कपड्याचे साबण, अंगाचे साबण, तेल यांचा समावेश आहे.

अशा आणीबाणीच्या परिस्थितीत पुढाकार घेऊन गरजू लोकांना आपण मदत केली पाहिजे. तसेच ज्या लोकांना गरजू लोकापर्यंत मदत पोहोचवायची आहे त्यांनी 9822189229 या नंबर वर संपर्क साधून आपली मदत पोहोचवावी, असे आवाहन पांडुरंग भालेकर यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.