_MPC_DIR_MPU_III

Pimpri : जैन सोशल ग्रुप डायमंडच्या अध्यक्षपदी पंकज गुगळे

एमपीसी न्यूज- पिंपरी चिंचवडमधील जैन सोशल ग्रुप डायमंडच्या अध्यक्षपदी नुकतीच पंकज गुगळे यांची निवड झाली. मावळते अध्यक्ष सुनील शहा यांच्याकडून त्यांनी रविवारी (दि. 7) एप्रिल रोजी झालेल्या पदग्रहण समारंभात पदभार स्वीकारला. अध्यक्षपदाची सूत्रे लालचंदजी जैन, आयडी, जेसीआयएफ यांच्याकडून स्वीकारली.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जेसीआयएफचे माजी अध्यक्ष शरदभाई शहा, इंटरनॅशनल डायरेक्टर मनेश शहा, एमआरसी अध्यक्ष राजेंद्र धोका, उपाध्यक्ष दिलीप मेहता, सचिव डॉ. राजेंद्र दोशी, सहसचिव अमोल झवेरी, पुणे परिवाराचे अध्यक्ष दिलीप चोरबोले, मंजुषा धोका, अंजली चोरबोले आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी जैन सोशल ग्रुप डायमंडच्या इतर पदाधिका-यांनी देखील पदभार स्वीकारला. उपाध्यक्षपदी अतुल धोका, सचिवपदी प्रशांत गांधी, सहसचिवपदी कमलेश चोपडा, कोषाध्यक्षपदी संतोष छाजेड यांची निवड करण्यात आली. तसेच सदस्यपदी संजय कासवा, मीलन पटेल, पवन शहा, विजय मुनोत, कमलेश भळगट, किरण शहा व संजय सोलंकी यांची निवड करण्यात आली.

_MPC_DIR_MPU_II

पदग्रहण समारंभानंतर पुढील योजनांविषयी बोलताना पंकज गुगळे म्हणाले की, महावीर जयंतीनिमित्त आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, मतदान जागृती व पाणी वाचवण्याच्या विशेष उपक्रमांवर भर देण्यात येणार आहे. जैन सोशल ग्रुपतर्फे विशेषत्वाने राबवण्यात येणा-या एज्युकॉन या शैक्षणिक उपक्रमात आत्तापर्यंत 300 गरजू व होतकरु विद्यार्थ्यांना दीड कोटी रुपयांची आर्थिक मदत उच्चशिक्षणासाठी करण्यात आली आहे.

प्रशांत गांधी यांनी आभार मानले. मनीषा जैन आणि पवन शहा यांनी सूत्रसंचालन केले.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1